Terrifying video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण अनेकदा वाचलं ऐकलं असेल. म्हणून उशीर होत असला तरी घाई न करता सुरक्षित मार्गाने प्रवास करावा असं सांगितलं जातं. तरीही लोक आपलंच खरं करतात आणि अडचणीत सापडतात.

रेल्वे रुळ ओलांडू नका असं अनेकदा सांगूनही वेळ वाचवण्यासाठी आणि उशीर झालाय म्हणून सर्रास लोक रेल्वे रूळ ओलांडून जातात. अनेकदा सुखरूप रेल्वे रूळ ओलांडून होतोही, पण अशावेळेस गंभीर आणि भयंकर अपघातही होतात. पण, असं सगळं असूनही जो तो आपली मनमानी करत असतो आणि यामुळे नियम तर मोडले जातातच, पण यात अनेकदा जीवही जातो हे अनेकांना कळत नाही.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Mother love Viral Video
‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”

सध्या अशीच काहीशी घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक माणूस रेल्वे रूळ ओलांडताना डोक्यावर पडतो. नेमकं त्याच्याबरोबर काय घडतं, ते जाणून घेऊ या…

हेही वाचा… “मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर”, नव्या नवरीचा उखाणा ऐकून पोट धरून हसाल, पाहा VIDEO

रेल्वे रूळ ओलांडणं पडलं भारी…

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक माणूस रेल्वे रूळ ओलांडताना दिसत आहे. रेल्वे रूळ ओलांडताना मध्ये बॅरिकेट येतो. पण, मागे न परतता त्या बॅरिकेडवर चढून हा माणूस रेल्वे रूळ ओलांडायचा प्रयत्न करतो. बॅरिकेडवर चढल्यावर अचानक त्याचा तोल जातो आणि तो उलटा खाली कोसळतो.

माणसाच्या अपघाताचा हा व्हिडीओ @official_sunilbalwada या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून अशाप्रकारे रेल्वे रूळ ओलांडणं टाळा, सुरक्षित राहा अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला एक लाखांच्या वर व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही धक्कादायक घटना बोईसर रेल्वेस्थानकाजवळ घडली असून, पुढील माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

हेही वाचा… तुम्हीच सांगा चूक कोणाची? तरुणीने शिवीगाळ करत रिक्षाचालकाला केली मारहाण, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आता तरी सुधरा”, तर दुसऱ्याने “एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “कदाचित बॅगेचे वजन जरा जास्त होतं, म्हणून तो खाली पडला असावा.”

Story img Loader