Mobile caught fire: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला थक्कच करणारे असतात, जे आपल्या कायमचे लक्षात राहतात. या डिजिटल युगात व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक वर्षांपासून जसजसा मोबाइलचा वापर वाढत गेला तसतशा अनेक दुर्घटनाही वाढत गेल्या. सोशल मीडियावर अशा दुर्घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेलेदेखील आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात एका महिलेच्या मोबाइलने अचानक पेटच घेतला. नेमकं घडलं तरी काय, जाणून घेऊ या..

ब्राझिलियन सुपरमार्केटमध्ये खरेदी करताना एका महिलेच्या मोबाइलने खिशातच पेट घेतला आणि महिलेला गंभीर दुखापत झाली. एक महिला ब्राझीलच्या अ‍ॅनापोलिस भागातील एका सुपरमार्केटमध्ये होती तेव्हा तिच्या डेनिम पँटमधून अचानक धुराचे लोट बाहेर पडले. तिच्या मोबाईलला आग लागल्यानंतर तिच्या जिन्सने पेट घेतल्याचं पाहून तिच्या शेजारी उभा असलेल्या तिच्या नवरा धक्काच बसला.

महिलेच्या खिशातच मोबाइलने घेतला पेट

सुपरमार्केटमधील याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सुपरमार्केटमध्ये लोकांची खरेदीसाठी झालेली वरदळ दिसतेय आणि पुढच्याच क्षणी एका महिलेच्या पँटच्या पॉकेटमधून धूर निघाला. वृत्तानुसार, महिलेच्या मागच्या खिशात फोन होता ज्याचा स्फोट झाला आणि जिन्सला आग लागली. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. पत्नीच्या मागच्या खिशात आग लागल्याचे लक्षात येताच पतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग लागल्याने वेदना होत असल्याने पत्नी जोरजोरात ओरडत होती आणि तिच्या मागे पती धावला आणि तिच्या जिन्सवर हात मारत त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, इतर ग्राहक आणि सुपरमार्केट कर्मचारी काय घडले ते पाहत होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हि़डीओ @svsnewsagency या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “सुपरमार्केटमध्ये फोनचा स्फोट, महिलेला गंभीर दुखापत… ब्राझीलमधील सुपरमार्केटमध्ये किराणा सामान खरेदी करत असताना एका महिलेच्या मागच्या खिशात स्फोट झाला. हा फोन मोटोरोला मोटो E32 आहे, जो एक वर्षापूर्वी खरेदी केला होता. मोटोरोलाने या विचित्र घटनेची चौकशी करण्यासाठी महिलेशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

घटनेबद्दल अधिक माहिती

वृत्तानुसार, महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि तिच्या हातावर, कपाळावर, पाठीवर आणि नितंबांवर भाजल्याचे आढळले. त्या भयानक प्रसंगात तिच्या केसांचा काही भागही जळाला.