Shocking video: आकाशात उंच उडायला कुणाला आवडणार नाही. विमानाने आपण आकाशात पोहोचतो खरं पण पक्ष्यासारखं उडावं असंही आपल्याला वाटतं. यासाठी स्काय डायव्हिंग केलं जातं. पॅराशूटच्या मदतीने हवेत उडता येतं. पण जरा विचार करा स्कायडायव्हिंग करता करता अचानक पॅराशूटचं काही झालं तर… असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लोकांना अनेक छंद असतात. अनेकांना जीवनात साहस आणि रोमांच हवे असतात. यासाठी अनेक लोक अनेक साहसी खेळ खेळतात. अनेक साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होतात. परंतु हे साहसी उपक्रम करत असताना लोकांनी सुरक्षिततेच्या उपायांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.
अनेकवेळा छोट्याशा चुकीमुळे लोकांचा जीव धोक्यात येतो. असाच काहीसा प्रकार एका स्कायडायव्हिंग शिकवणाऱ्या व्यक्तीबरोबर पाहायला मिळाला आहे जिथे स्कायडायव्हिंग प्रशिक्षकाच्या चुकीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात डायव्हिंग प्रशिक्षकाला जीव गमवावा लागला. ही संपूर्ण घटना जवळच व्हिडिओ बनवणाऱ्या एका व्यक्तीच्या फोनमध्ये कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही सेंकदापूर्वी सर्व ठीक असताना हा व्यक्ती मृत्यूच्या जाळ्यात कसा ओढला गेला पाहाच.
२० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
काही साहसी खेळ अत्यंत धोकादायक असतात. स्कायडायव्हिंग हा असाच एक धोकादायक खेळ आहे. जिथे लोक हजारो फूट उंचीवरून पॅराशूटने उडी मारतात. एखाद्याला हवेत काही सेकंद फ्री फॉल मिळतात. तितक्यात ते खाली उतरणार असताना तो पॅराशूट उघडतो. आणि सहज जमिनीवर सुरक्षित लँडिंग करतो. मात्र या व्हिडिओमध्ये स्कायडायव्हिंगशी संबंधित गोष्टी लोकांना शिकवणाऱ्या प्रशिक्षकानेच चूक केली. त्यामुळे उंच टेकडीवरून थेट खाली पडून त्याचा मृत्यू झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा स्कायडायव्हिंग प्रशिक्षक हा ब्राझीलचा प्रसिद्ध स्कायडायव्हर जोस डी ॲलेंकार लिमा जूनियर आहे. जो ब्राझीलच्या साओ कॉनराडो भागात ८२० फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करण्याच्या तयारीत होता. मात्र नंतर त्याचा तोल गेला आणि पॅराशूटसह खड्ड्यात पडला. या अपघातात त्याचा मृत्यू होतो. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? रुळ ओलांडताना वंदे भारत एक्सप्रेस आली अन् एका निर्णयानं आजोबा असे बचावले
ब्राझीलचे जोस डी ॲलेंकार लिमा जूनियर हे देशातील एक प्रसिद्ध स्कायडायव्हिंग प्रशिक्षक होते. जवळपास २० वर्षांपासून तो लोकांना डायव्हिंगचे प्रशिक्षण देत होते. अशातच स्काय डायव्हिंग करताना त्यांचाच अपघात लोकांना हादरवत आहे.