सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असत. यात कधी कधी असेही फोटो किंवा व्हिडीओ असतात की ते व्हिडीओ आपल्याला विचार करायला भाग पडतात. अनेकदा काही व्हिडीओ काही तरी चांगल शिकवून जातात तर काही व्हिडीओ बघून भीती वाटते. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण कुटुंब कारमध्ये बसलेले असतानाच एका उंच कडाच्या काठावरुन कार खाली सरकली. हा व्हिडीओ ‘साउथ चयना मॉर्निंग पोस्ट’ या नावाच्या फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला ४० हजाराहून जास्त लोकांनी बघितले आहे.

नक्की काय झालं?

डेली मेलच्या वृत्तानुसार, चीनच्या झिंजियांगच्या डुकू महामार्गावर कुटुंबाने आपली कार समोरचा सुंदर नैसर्गिक नजरा बघण्यासाठी उभी केली. कार उंच कडाच्या टोकालाचं उभी केली. ज्या ठिकाणी त्यांनी त्यांची कार उभी केली होती ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जिथून दरी दिसते. व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की  एक माणूस कार उभी करून काहीतरी पिण्यासाठी कारमधून बाहेर पडला होता. तेवढ्यात कार हळू हळू पुढे सरकू लागली. घाबरलेल्या माणसाने कार पुढे सरकत असलेल्या कारला पाठी ओडण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. याच दरम्यान कुटुंबातील दोन सदस्य वाहनातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. तरुण मुलगा मागच्या सीटवरून बाहेर पडण्यात यशस्वी झाला, त्यानंतर एक वृद्ध महिला. तथापि, समोरच्या सीटवरील आणखी एक महिला कारमधून बाहेर पडण्यासाठी सीट बेल्ट काढू शकली नाही, असे द सनने म्हटले आहे. कार खाली पडल्यावर तिच्या सहप्रवाशांना भयभीत होऊन पाहण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाही.

हेजिंग काउंटी इमर्जन्सी मॅनेजमेंट ब्युरोच्या म्हणण्यानुसार कारमध्ये अडकून खाली पडलेली महिला सुदैवाने वाचली पण तिला दुखापत झाली. ही घटना का घडली हे समजलं नसलं तरी सोशल मीडियावर हा व्हिडीओ बघितलेल्या नेटीझन्सनी असा अंदाज लावला की कारमधला हँडब्रेकपासून स्नेप केलेल्या केबलपर्यंत काहीही कारण असू शकते. गेल्या महिन्यात सोशल मीडीयावर आणखी एक भयानक व्हिडीओ समोर आला होता. व्हिडीओमध्ये दोन महिला रशियात ६,३०० फूट उंच कडाच्या काठावर असलेल्या झोपाळ्यावरून खाली पडताना दिसल्या.

Story img Loader