Man Caught Between Electric Wires Video: लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला व्हिडिओ आढळून आला. इस्रायलमध्ये प्रवेश करताना पॅलेस्टिनी दहशतवादी विजेच्या तारांमध्ये अडकून त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करणारा हा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर युजर Hillel Fuld ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील त्याच दाव्यासह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि एकाधिक कीफ्रेम मिळवून आमचा तपास सुरू केला. प्रत्येक प्रतिमेवर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च केले. आम्हाला sohu.com वर एक बातमी सापडली, ज्यामध्ये पॅराग्लायडर हाय-व्होल्टेज पॉवर लाईनला धडकून आग लागल्याच्या अफवा होत्या असे सांगण्यात आले होते.
चीनच्या स्थानिक भाषेतील वृत्तात म्हटले आहे: वांगच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत उच्च-व्होल्टेज वायरवर टांगलेल्या पॅराग्लायडरचा अपघात झाल्याचे आम्ही ऐकलेले नाही. व्हिडिओच्या आधारे हा अपघात दक्षिण कोरियामध्ये झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
रिपोर्ट मध्ये असेही म्हटले आहे: कोरियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, १६ जून रोजी संध्याकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी, दक्षिण कोरियातील जेजू वेस्टर्न फायर डिपार्टमेंटने उघड केले की त्यांना एक सूचना मिळाली होती की एक व्यक्ती Seogwipo जवळ पॅराग्लायडिंग करताना उच्च-व्होल्टेज पॉवर लाइनमध्ये अडकली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला या तारांमधून सोडवले असता त्या ६० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता.
आम्ही वरील परिच्छेद कोरियन भाषेमध्ये अनुवादित केले आणि अधिक बातम्या इंटरनेटवर शोधल्या. आम्हाला news.nate.com वर एक कोरियन बातमी सापडली ज्यात असे म्हटले आहे की, जेजू येथे पॉवर पॅराग्लायडिंग करताना हाय-व्होल्टेज लाईनमध्ये अडकल्याने 60 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
त्याच घटनेबाबत आम्हाला आणखी काही बातम्या सापडल्या.
http://www.jibs.co.kr/news/replay/viewNewsReplayDetail/2023061619213570284?feed=da&kakao_from=mainnews
आम्हाला घटनेचे व्हिडिओ रिपोर्ट्स देखील सापडले.
तीन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. आम्हाला इंटरनेटवर अपघाताचे स्पष्ट फुटेज देखील सापडले, जे काही वापरकर्त्यांनी कोरियन कॅप्शन सह अपलोड केले होते.
हा कलर व्हिडिओ होता आणि याचाच ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला जात होता.
निष्कर्ष: एक पॅलेस्टिनी दहशतवादी हवाईमार्गे इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत, विजेच्या तारेमध्ये अडकला आणि त्याचा मृत्यू झाला असा दावा करणारा व्हिडिओ मुळात साऊथ कोरियाचा आहे. ही घटना तीन महिन्यापूर्वी घडली आणि यात एका साठ वर्षीय माणसाचा मृत्यू झाला होता.