जे लोक व्यसनाधीन गेलेले असतात, ते लोक त्यांना ज्या पदार्थाचं व्यसन आहे, त्याच्या वाईट परिणामकडे दुर्लक्ष करतात. शिवाय ते या पदार्थांचे नुकसान काय आहे, हे सांगण्यापेक्षा त्याचे फायदे काय काय आहेत हेच सांगण्याचा प्रयत्न करतात. शिवाय तुम्ही जर अशा व्यसनामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे नुकसान होऊ शकतं, असं त्यांना सांगितलं तर ते याउलट व्यसनाचे हजार फायदे काय आहेत हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा व्यसनी लोकांना सल्ला देण्याचा काहीच फायदा नसतो असं म्हटलं जातं..
सध्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दारूच्या दुकानावर दारु पिण्याचे अनेक फायदे लिहिले आहेत. व्हायरल पोस्टमध्ये एक दारूचे दुकान दिसत आहे. दुकानाच्या खिडकीखाली असं काही लिहिलं आहे, जे वाचल्यानंतर दारु न पिणाऱ्यांदेखील दारु प्यावी की काय? असा प्रश्न पडेल. हो कारण या दुकानावर दारु पिण्यासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने काही मजकूर लिहिला आहे. हा मजकूर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय तो वाचल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. तर अनेकांनी हे लिहिणाऱ्याचं कौतुकदेखील केलं आहे.
दारू पिणाऱ्यांसाठी ४ ओळी –
भिंतीवर हिंदीत लिहिलं “दारू से नशा मिलता है, नशे से जुनून, जुनून से मेहनत, मेहनत से पैसा, पैसे से इज्जत मिलती है और इज्जतदार वहीं होता है जो दारू पीता है” आता एकदा तुम्हीच विचार करा की, या ओळी वाचल्यानंतर कोण दारू न पिण्याचा विचार करेल का? काही नेटकऱ्यानी ही पोस्ट पाहिल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून दारूची बाटली घेऊन बसावं वाटत असल्याचं म्हटलं आहे. दारुच्या दुकानाबाहेरचा हा फोटो indian.official.memes नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर अनेक नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एकाने लिहिलं आहे, “आजपासून दारु प्यायला सुरुवात” तर दुसऱ्याने, “हे फक्त दारुच्या दुकानाबाहेर लिहंल जाऊ शकतं” असं म्हटलं आहे.