‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे आणि सिनेमेचे निर्माते संजय राऊत यांच्यात झालेल्या वादानंतर त्याचे पडसाद आता सोशल नेटवर्किंगवर उमटू लागले आहेत. चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे तडकाफडकी उठून निघून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर या प्रकरणाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. मनसेच्या नेत्यांपासून ते सामान्यांपर्यंत अनेकांनी या प्रकरणामध्ये आपले मत नोंदवले आहे. त्यातही काल रात्री हा प्रकार घडल्यानंतर अनेक मनसैनिंकांनी #ISupportAbhijeetPanse हा हॅशटॅग वापरून या प्रकरणामध्ये पानसेंची बाजू घेतली आहे.
२३ जानेवारी रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास ‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान मुंबईतील अॅट्रिया सिनेमागृहामध्ये पानसे आणि राऊत यांच्यादरम्यान घडलेले मान अपमान नाट्य कॅमेरांमध्ये कैद झाले. त्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. यानंतर अनेकांनी #ISupportAbhijeetPanse हा हॅशटॅग वापरून याप्रकरणामध्ये पानसेंना पाठिंबा दिला आहे. ‘ठाकरे’ सिनेमाचे श्रेय मनसेला मिळू नये म्हणून सेनेने जाणून बुजून हे केल्याच्या आरोपापासून ते राऊत यांना आता दिग्दर्शकाऐवजी दिशादर्शकाची गरज आहे असे अनेक ट्विटस या हॅशटॅगवर पहायला मिळत आहेत. याचबरोबर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या सर्व प्रकरणानंतर अभिजित पानसे यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे ट्विटवर सांगितले. त्यामध्ये अभिजित यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना, ‘मी चित्रपट मा बाळासाहेबांच्या प्रेमापोटी केला बाकी कोणी कस वागायचं हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा प्रश्न (आहे)’ असं मत व्यक्त केल्याचंही देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहेत. पानसेंचे हेच वक्तव्यांचे फोटोही सोशल मडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
एवढी घाबरते शिवसेना…!
“ठाकरे” चित्रपटाचे श्रेय मनसे ला मिळू नये म्हणून सेने ने जाणून बुजून चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मनसे नेते यांना चित्रपटाच्या स्क्रिनिंग ला मुद्दाम सीट्स उपलब्ध करू दिल्या नाही एवढी घाबरते शिवसेना…! #ISupportAbhijeetPanse pic.twitter.com/xSh1jyQP5U
— Vaibhav Velapure (@VaibhavVelapur5) January 23, 2019
जय मनसे_जय पानसे
‘ठाकरे’ सिनेमा नक्की बघा, जेव्हा जेव्हा आवडेल तेव्हा तेव्हा एकच नारा द्या, ‘जय मनसे_जय पानसे ! ‘#ISupportAbhijitPanse#IAmwithAbhijitPanse
— Raju Patil (@rajupatilmanase) January 24, 2019
राऊतांना ‘दिग्दर्शकाची’ नाही तर ‘दिशादर्शकाची’ गरज आहे
संजय राऊतांना आता “दिग्दर्शकाची” नाही… तर “दिशादर्शकाची” गरज आहे…
भैसाटलय बेणं…#ISupportAbhijeetPanse @abhijitpanse @SandeepDadarMNS @advAkshaykashid @TulsidasBhoite @ajitchavanzee @manaseit— Yogesh J Chile (@YogeshJChile1) January 23, 2019
अभिजित पानसे, संपूर्ण प्रेक्षक वर्ग तुमच्या सोबत
अभिजित पानसे साहेब,
तुम्ही सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून @ThackerayFilm ला न्याय दिला आणि त्यांनी शेवटी बाळासाहेबांचे संस्कार विसरून बसल्याचे पुरावे दिले..
फक्त महाराष्ट्र सैनिकच नव्हे तर संपूर्ण प्रेक्षक वर्ग तुमच्या सोबत आहे#ISupportAbhijeetPanse #ThackerayTheFilm#म #मराठी pic.twitter.com/PR9dHL7yKL— अनिकेत गमे (@MH_Maza) January 23, 2019
दिग्दर्शकाला इज्जत देऊ शकत नाहीत ते मराठी माणसाला काय देणार
जे दिग्दर्शन करणाऱ्या व्यक्तीला इज्जत देऊ शकत नाही ते सामान्य मराठी माणसाला काय इज्जत देणार ? @ShivSena @abhijitpanse #ISupportAbhijeetPanse
— Tanaji Pise (@tanaji_pise) January 23, 2019
लोकांच्या मनातली जागा कशी काढणार
तुम्ही दिग्दर्शकाला कदाचित थिएटर च्या बाहेर उभे करू शकतात,,
पण त्याची लोकांच्या मनातली जागा कोणी हिसकावून काढू शकत नाही,,( #संजय_राऊत गेट वेल सून ,,)#ISupportAbhijeetPanse #Thackeray
— Mahadeo Sawant (@mahadeo84) January 23, 2019
ही शिवसेना बाळासाहेबांची नाही
@ShivSena शिवसैनिक कोणत्या तोंडाने या शिवसेने कडे बघतात ठाऊक नाही!! पण ही शिवसेना बाळासाहेबांची नाही हे आज त्यांचा जयंतीलच सिद्ध झालं। #ISupportAbhijeetPanse
https://t.co/fFBbukMEoC— Rajesh pawar (@Rajeshp56782882) January 23, 2019
दाद देता येत नसेल तर नाव तरी ठेऊ नका
कलाकृतीचा उपयोग जरी राजकीय स्वार्थासाठी केला जाणार असेल तरी ती कलाकृती साकार करण्यासाठी कलाकाराने “कलाकार” म्हणून पूर्ण जीव ओतून काम केलं आहे, त्याला दाद देता येत नसेल तर किमान नावं ठेवू नका#ISupportAbhijeetPanse
— पुणेरी नजर..! (@OfficeOfPunekar) January 23, 2019
हे शिवसेनेने कायम लक्षात ठेवावे
“ठाकरे” चित्रपट मनसे नेते अभिजित पानसे साहेबानी बनवला आहे हे शिवसेने ने लक्षात ठेवावे, चित्रपट चालवायचा की आपटायचा हे महाराष्ट्र सैनिकांना चांगलं माहिती आहे पण इतके नीच पातळीवर आम्ही जाणार नाही पण तुमची वाजवल्या शिवाय राहणार पण नाही #ISupportAbhijeetPanse
— Vaibhav Velapure (@VaibhavVelapur5) January 23, 2019
हे साहेबांना ठाऊक नाही
उद्धव ठाकरे नेहमी बोलतात ना शिवसेना संपवणारा अजून जन्माला यायचा आहे,
उद्धव ठाकरेंना कदाचित माहित नसेल हा संजय राऊत जन्माला त्याचसाठी आला आहे ते ! #ISupportabhijeetpanse— sunil salunkhe | सुनिल साळुंखे (@Sunil_Satarkar) January 23, 2019
मान अपमानाबद्दल काय म्हणाले होते प्रबोधनकार
मान हा जगाला ओरडून सांगायचा असतो आणि अपमान हा नेहमी मनांत ठेवायचा असतो -प्रबोधनकार ठाकरे #ISupportAbhijeetPanse @abhijitpanse
— sunil salunkhe | सुनिल साळुंखे (@Sunil_Satarkar) January 23, 2019
आज साहेबांना सुद्धा हे बघून दुःख झालं असेल
ह्या फोटो मध्ये सर्व जण आहेत
पण ज्या माणसाने ठाकरे चित्रपट यशस्वी करण्यासाठी सगळ्यां इतकंच योगदान दिल नेमका तोच माणूस नाही
आज साहेबांना सुद्धा हे बघून दुःख झालं असेल….#ISupportAbhijeetPanse pic.twitter.com/B6qKCgKR3u— Tejas Dattaram Sarang (@TDSMNS) January 23, 2019
ही राजसाहेबांची शिकवण आहे
जिथे सन्मान नाही तिथे थांबण्यात काहीच अर्थ नसतो, आणि हे संस्काराचा भाग आहे राजसाहेबांची शिकवण आहे !!अन्यथा काही जण लाचार म्हणूनच अजुनही जगत आहेत !! जिंकलत @abhijitpanse #ISupportAbhijeetPanse
— Tanaji Pise (@tanaji_pise) January 23, 2019
चित्रपट बनवायला मनसेची माणसे लागतात
बाळासाहेबांवर चित्रपट करायला मनसे ची माणसं लागतात। पण क्रेडिट मिळू नये म्हणून शिवसेना इयकी घाबरते???
— Rajesh pawar (@Rajeshp56782882) January 23, 2019
राऊत वेळोवेळी काळजी घेतात
#मनसे आणि #शिवसेना एकत्र येऊ नये,, ह्याची #संजय_राऊत वेळोवेळी काळजी घेत असतात..#ISupportAbhijeetPanse #म@mnsadhikrut @ShivSena
— Mahadeo Sawant (@mahadeo84) January 23, 2019
दिग्दर्शक हा सिनेमाचा बाप असतो निर्माता नाही
The real father of film was Director not a producer #ISupportAbhijeetPanse#ISupportAbhijeetPanse
— Nitin Pokharkar (@PokharkarNitin) January 24, 2019
त्यालाच खुर्ची मिळू नये
ज्याने साक्षात मा. बाळासाहेबांना पडद्यावर जिवंत केले. त्या चित्रपटासाठी त्यालाच खुर्ची मिळू नये ही किती मोठी शोकांतिका आहे. गरज सरो वैद्य मरो. यामुळेच सेनेवरच विश्वास उडालाय. #ISupportAbhijeetPanse @SandeepDadarMNS @YogeshJChile1
— Kishor borate (@kishorborate5) January 23, 2019
ठाकरे सिनेमा पाहताना उद्धव नाही राजच दिसतील
शिवसेनेच्या दुर्दैवाने “ठाकरे” चित्रपट पाहताना लोकांना बाळासाहेबांमद्धे आणि त्यांच्या प्रत्येक कृतीमद्धे उद्धव ठाकरे नाहीत, तर राज ठाकरेच दिसणार… #ISupportAbhijeetPanse@SandeepDadarMNS @abhijitpanse @ShivSena @manaseit @SachinMoreMNS
— Yogesh J Chile (@YogeshJChile1) January 24, 2019
दुसऱ्याच्या टेकू शिवाय काहीच नाही
सेनेची स्वतःची चित्रपट सेना आहे मग त्यात एक ही प्रतिभावान दिग्दर्शक असू नये ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे.. त्यासाठी त्यांना मनसे चा आधार घ्यावाच लागला,स्पष्ट आहे सेनेला दुसऱ्याच्या टेकू शिवाय उभं राहता येत नाही #ISupportAbhijeetPanse
— Vaibhav Velapure (@VaibhavVelapur5) January 24, 2019
त्यांना मान अपमान काय कळणार
ज्यांनी भाजप च्या पायाशी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवलाय, पदोपदी अपमानित व्हायची सवय झाली आहे, त्यांना दुसऱ्याचा मान- अपमान काय कळणार.. #ISupportAbhijeetPanse
— Vaibhav Velapure (@VaibhavVelapur5) January 24, 2019
दरम्यान या वादानंतर संजय राऊत यांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरला आहे. ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.