थायलंडमध्ये सध्या ४५ वर्षीय महिला नेता चर्चेत आहे. प्रापापोर्न चोइवाडकोह असे नाव असलेल्या या महिला नेत्याला २४ वर्षीय दत्तक मुलासह नको त्या अवस्थेत पतीनेच पकडल्यानंतर एकच गजहब उडाला. प्रापापोर्न यांच्या पतीने दोघांना आक्षेपार्ह स्थितीत रंगेहात पडकलं. या घटनेचा व्हिडीओ थायलंडमध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तसंस्थेने सदर वृत्त दिले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रापापोर्न यांच्या पक्षानेही त्यांच्यावर कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे.
प्रकरण काय आहे?
प्रापापोर्न चोइवाडकोह आणि त्यांच्या पतीने मागच्या वर्षीच एका मंदिरातून ‘फ्रा’ नावाच्या भिक्षुकाला दत्तक घेतले होते. मात्र दत्तक घेतल्यानंतर पत्नी आणि मुलामध्ये जवळीक वाढल्याचा संशय पतीला आला. त्यामुळे पतीने दोघांवर पाळत ठेवली. एकेदिवशी पतीने अचानक घरी जाण्याचा निर्णय घेतला. घरी गेल्यानंतर जे चित्र दिसलं, ते पाहून त्याला धक्काच बसला. या घटनेचं पतीनेच चित्रीकरणही केलं. ज्यामध्ये पत्नी आपली बाजू मांडताना दिसत आहे.
किम जोंग-उनच्या मनोरंजनासाठी दरवर्षी २५ सुंदर मुलींची भरती; उत्तर कोरियातून पळालेल्या लेखिकेचा दावा
पत्नी आपल्या राजकारणी पत्नीला विचारतो की, तुम्ही दोघे आनंदी आहात ना? पतीच्या या अचानक केलेल्या हल्ल्यामुळे पत्नी गोंधळून जाते आणि तुमचा गैरसमज झाला असल्याचे सांगते. आम्ही फक्त गप्पा मारत असून तसे काही नाही, असेही सांगण्याचा प्रयत्न प्रापापोर्न करतात. त्यांचा दत्तक मुलगा फ्रा हादेखील वडिलांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला दिलेल्या प्रतिक्रियेत पतीने सांगितले की, मी त्या दोघांनाही रंगेहात पकडल्यानंतर मला धक्काच बसला. माझा विश्वासघात झाला. मी माझ्या पत्नीवर मनापासून प्रेम केलं, पण त्याबदल्यात मला दगा मिळाला.
या घटनेमुळे थायलंडच्या राजकीय वर्तुळातच नाही तर चीनमध्येही चर्चा होत आहे. चीनमध्येही सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे लोकांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. सदर घटना टीव्ही मालिकेतील नाट्यालाही लाजवेल अशी असून आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया लोक नोंदवत आहेत.
प्रापापोर्न या थायलंडच्या राजकारणात ‘मॅडम प्ली’ या नावाने ओळखल्या जातात. सेंट्रल थायलंडमधील सुखोताई या भागातून त्या राजकारणात आल्या. स्थानिक चेम्बर ऑफ कॉमर्स संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. तसेच थायलंडमधील डेमोक्रॅट पक्षाच्या त्या नेत्या होत्या. मात्र हे प्रकरण घडल्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्याबाबत पुढील निर्णय घेऊ असे निवेदन डेमोक्रॅट पक्षाने दिले आहे.