आपल्या देशात दोन लग्न केल्यास संबंधित व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल होतो. पण थायलंडमध्ये एका व्यक्तीने आतापर्यंत १२० लग्न केली आहेत. तंबन प्रैझर्ट असे या व्यक्तीचे नाव आहे. तंबन आपल्या १२० बायकांचाही आदर करतात. त्यांचे सर्व लाडही पुरवतात. प्रत्येकीला एकमेकांबद्दल सर्व माहित आहे, हे या घराचे विशेष आहे. तंबन आता ५८ व्या वर्षांचे आहेत. आतापर्यंत झालेल्या १२० लग्नांमधून त्यांना २८ मुले झाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टॉयलेट पेपरपासून होणार वीजनिर्मिती; संशोधकांचा दावा

बांधकाम व्यावसायिक असलेले तंबन थायलंडमधील नकोन नायोक प्रांतातील फ्रॉमनी जिल्ह्याचे प्रमुख आहेत. या ठिकाणच्या स्थानिक मीडियामध्ये त्यांनी १०० हून अधिक लग्न केल्याचे समोर आले आणि अखेर त्यांनाही ही गोष्ट मान्य करावी लागली. ते सांगतात, ‘मी १७ वर्षांचा होतो तेव्हा माझं पहिलं लग्न झालं. माझी पत्नी माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान होती. आम्हाला ३ मुलं झाली. त्यानंतर माझ्या आयुष्यात एकामागोमाग एक स्त्रिया येतंच गेल्या. यापैकी बहुतांश स्त्रिया तरुण होत्या. त्यांचे वय २० वर्षांपर्यंत होते. वयस्कर महिला मला फारशा आवडत नाहीत, कारण त्या खूप वाद घालतात,’ असंही तंबन म्हणाले.

Video : या चिमुकलीचं गाणं ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

तंबन सांगतात, ‘जेव्हा मी नवीन घर बनवायचो तिथे एक नवी पत्नीही मिळायची. मी या सर्वांवर प्रेम करतो आणि त्यादेखील माझ्यावर प्रेम करतात.’ या व्यवसायामुळे मला ही सवय लागल्याचे ते म्हणतात. प्रत्येक लग्न करण्याआधी तंबन आपल्या पूर्वीच्या सर्व पत्नींना याबद्दल सांगतात. लग्न करणार असलेल्या मुलीच्या घरी जाऊन रितसर परवानगी घेत पारंपरिक पद्धतीने लग्न करतात. तंबन यांच्या २२ पत्नी फ्रॉमनी जिल्ह्यातल्या त्यांच्या घराच्या आसपास राहतात. तंबन यांना या पत्नींपासून २८ मुले झाली आहेत. तंबन या सर्वांचा सांभाळ करतात. तंबन यांनी नुकताच २७ वर्षांच्या फोन हिच्यासोबत विवाह केला होता.