प्रवासादरम्यान ट्रेन, बस किंवा फ्लाइटची वाट बघता-बघता अनेक प्रवासी डुलकी घेताना दिसतात. काही वेळा अशी डुलकी लागते की, ट्रेन, फ्लाइट निघून गेली तरी प्रवासी झोपून राहतो. सध्या अशाच एका प्रवाशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एअरपोर्टवर फ्लाइटची वाट पाहता-पाहता अचानक झोपून जातो. त्यानंतर एअरपोर्टवरील कर्मचारी त्याला उठवण्यासाठी येतात; पण तो इतका गाढ झोपलेला असतो की, त्याला उठवता उठवता हे कर्मचारी वैतागतात.
थायलंडच्या फुकेत एअरपोर्टवर एका प्रवाशाबरोबर हा मजेशीर प्रसंग घडला, ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हा प्रवासी इतका गाढ झोपतो की, त्याचे फ्लाइट जवळजवळ चुकलेली असते. यावेळी एअरपोर्टवरील कर्मचारी जवळपास १५ मिनिटे त्याला उठवण्यासाठी प्रयत्न करतात; पण तो काही झोपेतून जागा होत नाही. एक पुरुष कर्मचारी खांदा धरून हलवण्याचा प्रयत्न करतो; पण तरीही तो जागा होत नाही.
असे सांगितले जात आहे की, एअरपोर्टवर बराच वेळ फ्लाइट पकडण्यासाठी प्रवाशाच्या नावाची अनाउन्समेंट झाली; परंतु तरी त्याला जाग आली नाही. त्यानंतर एअरपोर्टवरील एक महिला कर्मचारी आली आणि तिने त्या प्रवाशाला झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर तो उठला आणि फ्लाइट पकडण्यासाठी पळत गेला. हे दृश्य पाहून एअरपोर्टवरील प्रवासी जोरजोरात हसू लागले.
सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया
या व्हिडीओखालील कमेंट बॉक्समध्ये एका युजरने लिहिले की, “कदाचित तो घरी जाण्यास तयार नाही.” दुसर्याने लिहिले, “हा व्हिडीओ पाहून मला धक्का बसला, असे वाटले त्याला काही झाले तर नाही ना…; आणखीन एकाने लिहिले, हा व्हिडीओ पाहून मला हसू आवरणे अवघड होत आहे.