परियाराम ते तिरूवनंतपुरम असं सुमारे साडेपाचशे किलोमीटरच अंतर फक्त ७ तासांत कापून एका रुग्णवाहिकेच्या चालकानं एका महिन्याच्या मुलीचा जीव वाचवला. तिच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया होणं गरजेचं होतं. पण रुग्णालय ते घर असं अंतर साडपाचशे किलोमीटर होतं. वाहतूक कोंडीमुळे परियाराम ते तिरूवनंतपुरमममधलं अंतर रस्तेमार्गानं कापायला साधरण १४ तासांचा कालावधी लागतो. पण रुग्णवाहिकेचा चालक थामीम यानं फक्त ७ तासांत या चिमुकलीला रुग्णालयात पोहोचवलं.

Video : पोटात गोळी लागूनही सुरक्षारक्षकाने दिली चोरांशी झुंज

फातीमा लइबा ही एक महिन्याची मुलगी परियाम वैद्यकीय रुग्णालयात भरती होती. तिच्या हृदयावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. यासाठी तिला तिरुवनंतपुरममधल्या रुग्णालयात नेण्याची गरज होती. पण हे अंतर ५४० किलोमीटरचे होते. महामार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी असल्याने अंतर कापायला साधरणं १४ तासांचा अवधी लागतो. पण परियाराम वैद्यकिय रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालक थामीमनेदत मात्र वेळेत फातीमाला रुग्णालयात पोहोचवण्याची जबाबदारी स्विकारली. थामीम रुग्णवाहिका घेऊन रात्री ८.२० च्या सुमारास निघाला आणि पहाटे ३.२० च्या सुमारास तो रुग्णालयात पोहोचला.

जाणून घ्या ‘आलू डालो, सोना निकलेगा’ या राहुल गांधींच्या व्हिडिओमागचं सत्य

खरं तर यात जितका थामीमचा वाटा आहे तितकाच तो वाहतूक पोलीस आणि स्वयंसेवी संस्थाचाही आहे. या सगळ्यांनी आधी एक व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला. फातीमा कोणत्या रस्त्यावरून जाणार आहे, याची माहिती आधीच सगळ्यांना देण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर त्या दिवशी वाहतुकीची कोंडी कमी होती. फातीमाबद्दलचा मेसेज व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांनी सहकार्य दाखवलं. यामुळे थामीमला मोकळ्या रस्त्यावरून रूग्णवाहिका वेळेत रुग्णालयापर्यंत पोहोचवणं शक्य झालं.

Story img Loader