हत्ती हा दिसायला अवाढव्य असला तरीही तो अतिशय गोंडस आणि शांत प्राणी आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक हत्तींच्या समूहाचा तलावात अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आयएफएस अधिकारी परवीन केसवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय, “हे कुटुंब एकत्र अंघोळ करते आणि नेहमी एकत्र राहते.”
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की १५ ते २० हत्तींचा समूह यावेळी एका तलावामधून रस्ता पार करताना दिसत आहे. त्यातील काही हत्ती पाण्यात मजा करतानाही दिसत आहेत. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलंय. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडला आहे की ते यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत त्याचबरोबर इतर प्लॅटफॉर्म्सवरही हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. एक युजर म्हणाला, “परिवारासह राहणे हे आयुष्यातील सर्व गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.”
बाळाला कडेवर घेऊन भाषण केलं म्हणून महिला आयएएस अधिकारी ट्रोल; पतीने दिलेलं उत्तर जिंकेल तुमचं मन
याआधीही एक हत्ती आपल्या माहुताच्या फोनमध्ये डोकावत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तामिळनाडू येथील कुंभकोणम कुंभेश्वर मंदिराच्या बाहेर शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक माहूत आपल्या फोनमध्ये काही तरी पाहत असल्याचे दिसते. यानंतर त्याच्या शेजारी उभा असलेला हत्ती माहुताच्या फोनमध्ये डोकावतो.
कारला टेकून उभा राहिल्याने सहा वर्षाच्या मुलाच्या पेकटात घातली लाथ, नेटकऱ्यांचा संताप; Video Viral
आपण प्राण्यांवर प्रेम केले की तेही आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतात. माणूस आणि त्याच्या पाळीव प्राण्यांमधील सुंदर नात्याचे दर्शन घडवणारे अनेक व्हिडीओ आपल्याला इंटरनेटवर पाहायला मिळतील.