Thane Dahi Handi 2024 video : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होत आहे. सकाळपासूनच मुंबापुरीत ढाकुमाकुम, ढाकुमाकुम, स्वर कानावर ऐकायला मिळत आहेत. विविध गोविंदा पथकं आपल्या मंडळाची टी-शर्ट घालून दहीहंडी फोडण्यासाठी निघाली आहेत. मानवी मनोरे रचताना ‘बोल बजरंग बली की जय’ अशी घोषणा देत गोविंदा आपल्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवतायत. मुंबई, ठाण्यात मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपये पारितोषिक असलेल्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत. हाच मानवी मनोरा रचताना अनेकदा काहींचा तोलही जातो. ठाण्यात असाच एक मानवी मनोरा रचताना गोविंदाचा तोल गेला अन् तो थेट खाली आला याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा थरारक व्हिडीओ पाहताना तुमचाही श्वास थांबेल.
मच गया शोर… काठी न घोंगडे… सारख्या पारंपरिक गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव साजरा केला. विशेष म्हणजे ज्यावेळी हंडी फोडली त्यावेळी अतिशय चित्त थरारक अशा क्षणाची प्रेक्षकांना अनुभूती आली.ठाण्यातील दिघे साहेबांच्या दहीहंडीला ही घटना घडली आहे. दिघे साहेबांची दहीहंडी या मंडळाने आयोजीत केलेल्या दहीहंडीमध्ये ही घटना घडलीय. ठाण्यातील राजा गोविंदा पथकाचा हा व्हिडीओ असून या पथकाने थर लावताना हा प्रकार घ़डला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अचूक वेळेत थर लावणे आणि तो पुन्हा तसाच उतरविणे हे गोविंदा पथकाचं लक्ष्य असतं. त्याप्रमाणे या पथकातील सर्व गविंदांनी हे थर रचले खरे; पण शेवटी उतरताना सातव्या थरावरुन एका गोविंदाचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो. मात्र खाली असलेल्या पथकातील इतर सदस्यांनी वेळीच त्याला झेलल्याने सुदैवाने कसलीही दुखापत झालेली नाही. पण, हा क्षण मात्र उपस्थितांच्या अंगावर काटा उभा करणारा ठरला.
पुढे या व्हिडीओमध्ये दिसत आहे, हंडी फोडण्यासाठी सहाव्या थरावर चढलेला गोविंदा हा हंडीलाच लटकला आणि त्याचे इतर सहकारी हे खाली पडले. पण यावेळी गोविंदा घाबरला नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> तीन थरांचा मानवी मनोरा रचून गोविंदांनी सादर केला अफझल खानाच्या वधाचा प्रसंग, Video Viral पाहून अंगावर येईल काटा
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून गोविंदांनी स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.