Thane Woman Beats Mother-in-Law video : प्रत्येक घरात सासू-सुनेचे किस्से ऐकायला मिळतातच. काही प्रेमाचे असतात; तर काही भांडणाचे. सासू-सूनेचं भांडण हे काय नवीन नाही. पण, सुनेकडून वृद्ध सासूला अशा प्रकारे मारहाण करतानाचा हा धक्कादायक व्हिडीओ संतापजनक आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यामध्ये एका घरात एक महिला वृद्ध महिलेला मारहाण करताना दिसत आहे. मारहाण करणारी महिला ही त्या वृद्ध महिलेची सून आहे. घरगुती वादातून भांडण होणं ही सामान्य बाब आहे; पण अशा प्रकारे मारहाण करणे हे आक्षेपार्ह आहे.
वृद्ध महिलेला निर्दयीपणे मारहाण
ठाण्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एक सून तिच्या वृद्ध सासूला निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे. सासू-सुनेची भांडणं ही फक्त घरापुरती मर्यादित राहिलेली नाहीत, तर ती पडद्यावरही आली आहेत. टीव्ही सीरियल, फिल्म यामध्ये सासू-सुनेचं नातं दाखवलं जातं; जे पाहायला अनेकांना आवडतं. आतापर्यंत तुम्ही सासू-सुनेचे असे ड्रामे, भांडणं पाहिली असतील. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये सुनेनं चक्क सासूला बेदम मारलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
… म्हणून ठाण्यात सुनेकडून सासूला मारहाण
ही घटना ठाण्यातील कोपरी येथील सिद्धार्थनगर परिसरातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला वृद्ध महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे; तसेच तू इथून निघून जा, असं वारंवार आपल्या सासूला सांगत आहे. घरातून बाहेर जात नाही म्हणून ती सासूला वारंवार मारत आहे. सासूही प्रत्युत्तर देताना सुनेला शिवीगाळ करीत आहे. दरम्यान, हे सगळं सुरू असताना सून वृद्ध महिलेच्या दिशेनं धावून जाते आणि तिला निर्दयीपणे मारहाण करण्यास सुरुवात करते. वृद्ध महिलेला खाली जमिनीवर ढकलते, केस ओढते. हा सर्व प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> OMG! उकळत्या तेलात हात घालून तरुण तळतोय मंचूरियन भजी; विश्वास बसत नसेल तर..’हा’ पाहा VIDEO
विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे घरात आणखी एक महिला दिसत आहे; मात्र ती महिला पाहत असूनही कोणताही हस्तक्षेप करीत नाही. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी याची दखल घेतली आहे. ठाणे शहर पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओला उत्तर देत या प्रकरणी योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिले आहे.