Thane station viral video: गेल्या काही वर्षापासून मुंबई आणि उपनगरातील लाखोंच्या संख्येने चाकरमानी लोकल ट्रेनचा वापर करत आहेत.मुंबई सह त्याच्या उपनगरात अनेक नागरिक कामाच्या निमित्ताने स्थलांतरित होत आहे,त्याचा परिणाम लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा संख्या वाढू लागली आहे.त्यातून लोकलमध्ये प्रवाशांना अफाट गर्दीचा सामना करावा लागत आहे. यातूनच रोज अनेक अपघात घडतात.

‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे रूळ ओलांडू नका. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याचा वापर करा. तरीही अनेक प्रवासी पूल चढण्याचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात; पण अशा आततायी कृतीद्वारे अनेक जण अपघाताला आमंत्रण देतात; तर अनेक जण जीवानिशीही जातात. अशा बातम्या ऐकून वा प्रत्यक्ष तशा दुर्घटना बघूनही काही जण सिग्नल सुरू असतानाही थेट वाहने रुळांवरून नेताना दिसतात. मात्र, हे किती धोकादायक आणि जीवावर बेतू शकते हे या व्हिडीओतून पाहायला मिळाले आहे.

ठाणे स्टेशनवरील व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. एवढा भयंकर अपघात आणि त्यानंतर छिन्नविछिन्न झालेलं शरीर पाहून तुम्हीही यापुढे रुळ ओलांडण्याआधी शंभरवेळा विचार कराल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ठाणे स्टेशनवर रुळावर एक अपघात झाला आहे, हा अपघात इतका भयंकर पद्धतीनं झालाय की, यामध्ये व्यक्तीच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले आहेत. रुळावर एका बाजूला त्याचे हात पाय तर एकीकडे डोकं पडलंय. यावेळी कर्मचारी त्याच्या शरीराचे अवयव एकत्र करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल, तर स्वत:ला आवरा आणि थांबा. कारण- काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्याला हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो.

Story img Loader