Coldplay frontman Chris Martin: नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियम ‘कोल्डप्ले’ या जागतिक दर्जाच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बहुप्रतिक्षित अशा या कार्यक्रमाची गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी सुरू होती. १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी तीन दिवस हा कॉन्सर्ट नवी मुंबईत होत असून जवळपास दोन लाखाहून अधिक चाहते या संगीत सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी बँडचा प्रमुख गायक ख्रिस मार्टिनने भारतीय श्रोत्यांचे स्वागत केलेच, त्याशिवाय भारतात ब्रिटिशांची वसाहत असताना जे अन्याय-अत्याचार झाले, त्याबद्दलही भाष्य केले. ख्रिस मार्टिनच्या या विधानानंतर श्रोत्यांनीही त्यांला दाद दिली. तसेच ख्रिस मार्टिनने एकदा ‘जय श्री राम’ असाही नारा दिला. या दोन्ही संवादाचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एक्सवर ख्रिस मार्टिनचा एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. त्यात तो म्हणाला, “ब्रिटिशांनी भारतात केल्यानंतरही तुम्ही आम्हाला माफ केले, याबद्दल आपला आभारी आहे.” ख्रिस मार्टिनने पुढे म्हटले, आमचा भारतातला हा चौथा दौरा आहे. तसेच दुसऱ्यांदा आम्ही कॉन्सर्ट घेत आहोत. आज तुम्ही सर्व इथे मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल आपले धन्यवाद.

Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif ali Khan Attacker attack
Saif Ali Khan : एका पराठ्यामुळे सापडला सैफचा हल्लेखोर; पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? वाचा घटनाक्रम!
Beggar Purchases iPhone
Beggar Purchases iPhone : भिकार्‍याने रोख १ लाख ७० हजार देऊन खरेदी केला iPhone 16 प्रो मॅक्स; Viral Video पाहून नेटिझन्स थक्क
Saif Ali Khan stabbing accused
Saif Ali Khan Stabbing Case: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची बाजू मांडण्यासाठी भर कोर्टात दोन वकिलांमध्ये जुंपली
V Kamakoti
IIT Madras Director on Gaumutra : “तापानं फणफणत होतो, गोमूत्र पिऊन बरा झालो”, आयआयटीच्या संचालकाचा दावा; डॉक्टर म्हणाले…
Sanjay Raut on saif ali khan (1)
Sanjay Raut : “सैफ आणि करीना लव्ह जिहादचे प्रतिक होते अन् आता…”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!
Neeraj Chopra Wedding Who is Himani Mor Tennis Player Wife of India Golden Boy
Neeraj Chopra Wife: कोण आहे नीरज चोप्राची पत्नी? टेनिसपटू आणि आता आहे मॅनेजर; अमेरिकेत घेतेय शिक्षण

याच कॉन्सर्टमध्ये ख्रिस मार्टिनने एकदा ‘जय श्री राम’चाही नारा दिला. याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. गाण्याच्या सादरीकरणादरम्यान मंचावरुन फिरत असताना एका चाहत्याच्या हातातील फलक बघून ख्रिस मार्टिनने त्याकडे बोट दाखवत ‘जय श्री राम’ म्हटले. तसेच एका गाण्याचे सादरीकरण केल्यानंतर ख्रिस मार्टिनने हिंदी श्रोत्यांना साद घालत शुक्रिया असे म्हटले. त्यानंतरही श्रोत्यांनी त्याला दाद दिली.

ख्रिस मार्टिनने ब्रिटिश राजवटीबाबत केलेल्या विधानावर आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, “ख्रिसनं जे केलेले नाही, त्याबद्दल तो माफी मागतोय.” दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ख्रिसने माइक, स्टेज आणि संगीताच्या माध्यमातून भूतकाळातील जखमांवर फुंकर घातली.

कोल्डप्लेचा नवी मुंबईतील शेवटचा शो २१ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानंतर २५ आणि २६ जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये कॉन्सर्ट होईल.

Story img Loader