Thar Car Viral Video : लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कधी काय करतील याचा काही नेम नाही. अनेकदा तर लोक स्वत:च्या जीवाशी खेळताना मागे पुढे पाहत नाहीत, पण स्वत:बरोबर ते इतरांचा जीवही धोक्यात घालतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक थार चालक भररस्त्यात असे काही घातक कृत्य करतोय की पाहून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या थार चालकावर कडक कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

व्हिडीओमध्ये एक थार चालक आपल्या कारच्या छतावर माती टाकतो आणि तीच कार नंतर रस्त्यावर भरधाव वेगाने चालवत सुटतो. त्याच्या या अशा वागण्यावर लोक प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. ही घटना मेरठच्या मुंडली येथील आहे.

थार बॉयवर कडक कारवाई करा, नेटीझन्सची मागणी

तुम्ही आतापर्यंत माती वाहून नेण्यासाठी ट्रक किंवा ट्रॅक्टरचा वापर होताना पाहिला असेल, पण या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्टंटबाजीसाठी चक्क एका कारवर माती टाकताना दिसतोय. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक थार चालक खोऱ्याने माती ओढत थेट आपल्या कारवर टाकतोय. यानंतर तीच कार रस्त्याने अतिशय वेगाने पळवत नेतो, यामुळे थारच्या छतावरील माती हवेने रस्त्यावरून वाहनाने ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर उडू लागते. त्याच्या या कृतीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास होतो. त्याच्या अशा वागण्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ही घटना व्हायरल झाल्यानंतर युजर्सही कमेंट सेक्शनमध्ये थार बॉयवर कारवाई करण्याची मागणी करत होते.

स्टंटबाज चालकाची थार कार जप्त

अखेर हा व्हिडीओ मेरठचे पोलिस एसपी आयुष विक्रम सिंह यांच्यापर्यंत पोहोचला असून त्यांनी याबाबत विधान केलं आहे. यावर ते म्हणाले की, स्टंटबाज स्टंटमनची कार जप्त करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा – CNG कार चालवताना ‘या’ पाच चुका पडू शकतात महागात! जाणून घ्या

@zishan_thakurr नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. व्हिडीओतील धक्कादायक घटनेवर आता युजर्सही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, आता हे जरा जास्तच होत आहे. दुसऱ्याने लिहिले की, उत्तर प्रदेश पोलिस स्टंट लोकांशी योग्य कारवाई करतात. हे वाहन 207 MV कायद्यान्वये २४००० रुपयांच्या चालानसह जप्त करण्यात आले आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, आता वाहन जप्तही केले जाईल आणि दंड आकारला जाईल, पण काही दिवसांनी हे लोक पुन्हा असे प्रकार करताना सापडतील.