पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची काही खासगी माहिती आपल्याकडे असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ‘माझ्याकडील माहितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत. म्हणून तर मला लोकसभेमध्ये बोलू दिले जात नाही.’ असे आरोप राहुल गांधी यांनी केले. आता याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले नाही तर नवलच म्हणावे लागले. तेव्हा सोशल मीडियावर ‘#थरथर_मोदी’ हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधीं यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत घेत मोदींवर भष्ट्राचाराचे आरोप केले. ‘माझ्याकडील माहितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत. म्हणून तर मला लोकसभेत बोलू दिले जात नाही. त्यांच्या व्यक्तिगत भ्रष्टाचारासंदर्भात माझ्याकडे असलेल्या माहितीने त्यांना घाम फुटेल’ असा दावा त्यांनी केला होता. खरे तर राहुल गांधी यांचे आरोप म्हणजे पोकळ दावा आहे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. पण दुसरीकडे राहुल गांधींनी मोदी घाबरले आहेत असाही दावा केला आहे. तेव्हा सोशल मीडियावर ‘ #थरथर_मोदी’ हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये येताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपावार ट्विटरवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तेव्हा आज हे आरोप भारतीयांसमोर राहुल गांधी उघडे करतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे राहुल गांधींच्या आरोपांना मोदी कशा प्रकारे उत्तर देतात याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळे आधीच विरोधकांनी मोदींना धारेवर धरले आहे. मोदींनी संसदेत येऊन या विषयावर बोलावे अशी मागणी लावून धरत विरोधकांनी अनेकदा कामकाज रोखून धरले होते. तेव्हा मोदींनी ‘संसदेत विरोधक मला बोलू देत नाही’ असा आरोप केला होता.

https://twitter.com/2raman/status/809221920746917888

https://twitter.com/2raman/status/809221920746917888