एखाद्या व्यक्तीसोबत फेसबुकवर भांडण झालं की अनेकजण त्याला ब्लॉक करतात. एखाद्याकडून जर त्रास होत असेल किंवा त्या अकाऊंटवरून अश्लील मेसेज येत असतील तर ते फेसबुक पेज किंवा ती प्रोफाईल ब्लॉक करण्याचा पर्याय खूप आधीपासून आपल्याला फेसबुकनं उपलब्ध करून दिलाय. युजर्सला फेसबुकवर ब्लॉक करणं ही काही अवघड गोष्ट नाही. पण असं असलं तरी कोणताही फेसबुक युजर मार्क झकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चॅन यांना ब्लॉक करू शकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : नक्की वाचा मार्क झकरबर्ग आणि प्रिसिलाची ‘टॉयलेट एक प्रेमकथा’

कदाचित मार्क फेसबुकचा मालक असल्यानं त्याला आणि त्याच्या पत्नीला ही विशेष सूट देण्यात आल्याचं तुम्हाला वाटत असेल. पण यामागचं कारण मात्र वेगळं आहे. मार्क आणि प्रिसिला यांचे लाखो चाहते फेसबुकवर आहेत. मार्क स्वत: फेसबुकवर सक्रिय असतो. अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींवर तो आपलं मत मांडतो. त्याला फॉलो करणाऱ्या युजर्सला या अपडेट दिसतात. जर एखाद्याला मार्कचे विचार खटकले की तो युजर रागाच्या भरात मार्कला ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतो. पण असं करताना फेसबुकवर एरर मेसेज येतो. ‘संबधित व्यक्तीला तुम्ही ब्लॉक करू शकत नाही’ अशा प्रकारचा तो मेसेज असतो. फेसबुकमधल्याच तांत्रिक अडचणींमुळे हा मेसेज येत असल्याचा खुलासा फेसबुकच्या प्रवक्त्यानं केला असल्याचं ‘द गार्डियन’ वृत्तपत्रानं म्हटलं आहे. कमी वेळात एखादी प्रोफाईल जास्तीत जास्त लोकांनी ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला की हा एरर येतो, असं त्यानं सांगितलं. मार्क आणि प्रिसिला यांना लाखो युजर्सनं एकाचवेळी ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला असल्यानं ती प्रोफाईल आता ब्लॉक करणं अशक्य असल्याचं कारण त्यानं सांगितलं. फक्त मार्क किंवा प्रिसिलाच नाही तर अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रोफाईलला हा एरर येत असल्याचा खुलासाही त्यानं केला आहे. या एररवर फेसबुक काम करत असून, लवकरच यातून तोडगा निघेल, पण तूर्तास तरी कोणताही युजर या दोघांनाही फेसबुकवर ब्लॉक करू शकत नाही.