सोशल मीडियावर सक्रिय असणा-या प्रत्येकाला येणारा एक अनुभव म्हणजे आपण पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली न जाणे. मुलांना तर या गोष्टींचा खूपच अनुभव चांगला असतो. अनेकदा मुलींकडून फेसबुक, इन्स्टाग्रामवर पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट नाकारली जाते. आपण कोणत्याही वाईट हेतूने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नसली तरी मुलींकडून ती बरेचदा नाकारली जाते. आपण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली म्हणून तिने चुकीचा अर्थ तर नाही ना घेतला? असा विचार सारखा छळत राहतो. पण याव्यतिरिक्तही तुमची फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारण्याची बरीचशी कारणे असू शकतात, त्यामुळे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही तर निराश होण्याची गरज नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कारणासाठी मुली फ्रेंड रिक्वेस्ट नाकारतात
* जर मुली एखाद्या मुलाला ओळखत नसेल तर त्या रिक्वेस्ट स्वीकारत नाही. ओळख पाळख नसताना जर एखादा मुलगा रिक्वेस्ट पाठवत असेल तर मुलींच्या मनात शंका निर्माण होणे साहाजिकच आहे त्यामुळे त्या रिक्वेस्ट नाकारतात.
* काही मुली जरी फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया हाताळत असल्या तरी त्यांना जास्त सोशल व्हायला आवडत नाही. त्यामुळे शक्यतो जवळच्या आणि परिचयाच्या लोकांशीच त्या सोशल मीडियावर जोडलेल्या असतात, मैत्रीचा परिघ त्यांना वाढवायला आवडत नाही त्यामुळे तुमची फ्रेंड रिक्वेस्ट कदाचित नाकारली जाऊ शकते.
*अनेकदा मुलांकडून मुलींना वाईट अनुभव आल्याकारणाने त्या मुलांशी मैत्री वाढवणे टाळतात.
यासगळ्या गोष्टी असतातच पण काही मुलींना सोशल मीडियापेक्षा इतरही गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतात त्यामुळे कोणी रिक्वेस्ट पाठवली, मग त्याच्याशी मैत्री वाढवणे अशा फंद्यात मुली पडत नाही.
* नोटीफिकेशन दुर्लक्षित केले जाण्याचीही शक्यता असू शकते. त्यामुळे तुमची फ्रेंड रिक्वेस्ट कदाचित तिने पाहिलीही नसेल याचीही शक्यता असू शकते.
किंवा सोशल मीडियापासून कदाचित ती बराच काळ दूर असू शकते या कारणासाठी तुमची फ्रेंड रिक्वेस्ट तिच्या अकाउंटमध्ये पेंडिंग असू शकते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thats why girls didnt accept your friend request