Viral Video : सोशल मीडियावर पुणेरी पाट्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या पुणेरी पाट्यांवर कमीत कमी शब्दांत विनोदी पद्धतीने सूचना दिल्या जातात. ही एक अनोखी युक्ती पुणेकरांमध्ये दिसून येते. सोशल मीडियावर पुणेरी पाट्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाटीवर मजेशीर सुचना लिहिली आहे पण ही पुणेरी पाटी नाही. (thats why homemade bhaji and bhakari are best a pati goes viral on social media Shri Swami Samarth devotee shared post)
“…म्हणून घरची भाजी भाकरी सगळ्यात बेस्ट” (why homemade bhaji and bhakari are best)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पाटी दिसेल. या पाटीवर अगदी वर ‘श्री स्वामी समर्थ’ लिहिले आहे.
“जीभेची टेस्ट
पोटात गेले वेस्ट
आजार झाले गेस्ट
डॉक्टर करता टेस्ट
आपले पैसे झाले वेस्ट
म्हणून घरची भाजी – भाकरी
सगळ्यात बेस्ट”
पाहा व्हायरल व्हिडीओ (video viral)
sangitaa_.03 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “श्री स्वामी समर्थ” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कविता भारी आहे आणि उपयोगाची पण आहे. श्री स्वामी समर्थ” तर एरा युजरने लिहिलेय, “स्वामी हे समजला तू समर्थ आहेस? मग भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ! ” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर “श्री स्वामी समर्थ” लिहिले आहेत.
यापूर्वी सुद्धा चांगला संदेश देणाऱ्या अनेक पाट्या व्हायरल झाल्या आहेत. श्री स्वामी समर्थ यांचे भक्त सोशल मीडियावर अनेक चांगले संदेश शेअर करत असतात. स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात.श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे. स्वामींचे अनेक भक्त सोशल मीडियावर स्वामींविषयी प्रेम व्यक्त करताना दिसतात.