वयाच्या १०व्या वर्षी मुलं काय करतात असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर येतील खोड्या काढणारी, मैदानात किंवा फोनवर व्हिडीओ गेम खेळणारी मुलं. परंतु सगळीच मुलं अशी नसतात. काही मुलं तर अगदी लहान वयातच असं काही तरी काम करून जातात की ज्यामुळे ते इतरांसाठी एक आदर्श ठरतात. अशीच एक मुलगी आहे जिचं वय अवघे १० वर्षे आहे परंतु या लहान वयातही ती २ कंपन्यांची मालकीण आहे.
या मुलीचं नाव आहे पिक्सी कर्टिस. पिक्सी ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी आहे. तिने आपल्या आईच्या मदतीने एक कंपनी सुरु केली. या कंपनीचे नाव पिक्सीज् फीजेट्स (Pixie’s Fidgets) असे आहे. गेल्या वर्षी त्यांनी ही कंपनी सुरु केली असून पिक्सी या कंपनीची सीईओ आहे. तिचे काम लोकांना खूप आवडले. जेव्हा त्यांनी ही कंपनी सुरु केली तेव्हा फक्त ४८ तासांमध्येच त्यांची सर्व खेळणी विकली गेली.
कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचा साहसी पराक्रम पाहून तुमचाही उर अभिमानाने दाटून येईल
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पिक्सी फक्त एकाच कंपनीची मालकीण नाही तर या कंपनीच्या आधीपासून ती एक बिजनेस कंपनी चालवत आहे. या कंपनीचे नाव आहे पिक्सीज् बोवज् (Pixie’s Bows). ही कंपनी केसांचे सामान विकते. पिक्सी जेव्हा लहान होती तेव्हा तिच्या आईने पिक्सीच्या नावाने या कंपनीची सुरुवात केली होती.
सूत्रांनुसार, पिक्सीच्या गेल्या महिन्यातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर ती १ कोटी ४ लाखांपेक्षा जास्त होती. पिक्सीच्या खेळण्यांची इतकी मागणी आहे की ही खेळणी बाजारात येताच काही कालावधीतच त्यांची विक्री होते. पिक्सीच्या पालकांच्या सांगण्यानुसार, पिक्सी वयाच्या १५व्या वर्षी निवृत्ती घेणार आहे. इतक्या लहान वयात निवृत्ती स्वीकारणारी पिक्सी ही पहिलीच मुलगी असेल.
पिक्सी आपल्या भावासोबत मर्सिडीज कारने शाळेत जाते. या कारची किंमत १.४० कोटी इतकी असून त्यांच्या आलिशान घराची किंमत ४९.७२ कोटी रुपये इतकी आहे. पिक्सीचे इंस्टाग्रामवर १ लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. ज्या वयात मुलं खेळतात बागडतात अशा वयात पिक्सी २ कंपन्या सांभाळत आहे. त्यातून ती भरपूर पैसे कमावते आहे आणि इतरांनाही प्रेरणा देत आहे.