भारताच्या निसर्गरम्य पर्यटन स्थळांची भूल परदेशी पर्यटकांना पडली नाही तर नवलच म्हणावे लागले. त्यामुळे वर्षाचे बाराही महिने राजस्थानमध्ये पर्यटकांचा राबता असतो. इंटरनेटवर राजस्थानचे काही फोटो पाहून एका जपानी पर्यटकाने चक्क दिल्ली गाठली आणि तिथून हा पर्यटक राजस्थानला पोहोचला. राजस्थानचे रुप या पर्यटकाला इतके आवडले की खास राजस्थान भ्रमंतीसाठी त्याने पुष्कर जत्रेतून उंट विकत घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : ‘दंगल’पासून प्रेरणा घेत गावकऱ्यांनी घराबाहेर लावली मुलींच्या नावाची पाटी

२५ वर्षांचा माशिहारो याला राजस्थानच्या सौंदर्याची भूल पडली. राजस्थानचे सौंदर्य याचीडोळा पाहण्यासाठी त्याने राजस्थान गाठले. भारतीय संस्कृती आणि येथील लोककला पाहण्यासाठी त्याने पुष्करमधून उंट विकत घेतला. उंटावर सवार होऊन गेले दोन आठवडे हा पर्यटक राजस्थानमध्ये भटकंती करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितानुसार माशिहारोने पुष्करमधून काही दिवसांपूर्वी २५ हजाराला उंट विकत घेतला. गेल्या दोन आठवड्यात त्याने राजस्थानमधल्या वेगवेगळ्या भागात भ्रमंती केली. दररोज २५ किलोमीटरचा पल्ला गाठत वेगवेगळ्या ठिकाणी राहत या जपानी पर्यटकाने भारताला जवळून अनुभवायचे ठरवले आहे. दोन आठवड्यात भारताचे नवे रुप आपल्याला दिसले अशी प्रतिक्रियाही त्याने टाइम्सला दिली. राजस्थानमधली त्याची सफर जैसलमेरमध्ये येऊन संपणार आहे. जैसलमेरमध्ये पोहचल्यावर माशिहारो आपल्या देशात परतणार आहे.

VIRAL VIDEO: माकडाच्या पिल्लाला करायची होती चिमुकल्यासोबत गट्टी