Viral Video: तुम्ही एखाद्या खेळण्याच्या दुकानात गेलात की, तिथे ठेवलेली विविध खेळणी तुम्हाला आकर्षित करतात. एखादी बाहुली म्हणा किंवा एखादी गाडी किंवा बार्बी हाऊस अनेकदा तुमचं लक्ष वेधून घेतं. कारण या खेळण्यांची करण्यात आलेली हुबेहूब रचना आपसूकचं आपल्याला खरेदी करण्याच्या मोहात पाडते. या वस्तू बनवण्यात त्या प्रत्येक कलाकाराची तितकीच मेहनत असते. तर आज सोशल मीडियावर अशाच एका कलाकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने बनवलेली बुलेट बाईक आणि रेल्वेस्थानक तुम्हालाही थक्क करून सोडेल.
मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर)वर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने छोटी ट्रेन, इंजिन आणि एक छोटी बुलेट बनवल्याबद्दल कौतुक केलं जात आहे. व्हिडीओमध्ये ती व्यक्ती आधी त्याने बांधलेले रेल्वेस्थानक दाखवते, ज्यात प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्षात घेऊन सेटअपमध्ये मांडल्या आहेत. तसेच यामध्ये दोन छोट्या गाड्या रुळांवरून धावताना दिसत आहेत. तसेच व्यक्तीने बनवलेल्या ट्रेनचा वेग जास्त वा कमीसुद्धा करू शकतो. एकदा पाहाच व्यक्तीचे हे अनोखे कौशल्य…
हेही वाचा…तरुणाचा ‘भारत टू ऑस्ट्रेलिया’ प्रवास थेट; विमान, बस नाही तर स्कुटीवरून फिरणार १३ देश ; VIDEO पाहा
व्हिडीओ नक्की बघा…
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, ट्रेनव्यतिरिक्त त्या व्यक्तीने प्लॅटफॉर्मचा संपूर्ण सेटअपदेखील केला आहे, जो एका लाईटवर चालतो. अगदी ब्रिज, खाऊची दुकाने, एवढेच नाही तर प्रतीक्षाखोली, स्वच्छतागृहे या व्यक्तीने अगदीच हुबेहूब बनवली आहेत. तसेच एक छोटी बुलेट, ट्रेनचे स्टीम इंजिन आणि डिझेल इंजिनही बनवले आहे. या सर्व गोष्टी तांबे, पितळ, स्टीलपासून बनवलेल्या आहेत आणि त्या कसं काम करतात याचे प्रात्यक्षिकसुद्धा दाखवलं आहे, त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @HasnaZaruriHai या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘भारतात टॅलेंटची अजिबात कमतरता नाही आहे’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरी हा व्हिडीओ पाहून व्यक्तीच्या कल्पकतेचं आणि त्यानं रचना केलेल्या या खास रेल्वेस्थानकाच्या सेटअपचं कौतुक करताना व त्याच्या मेहनतीला दाद देताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. तुम्ही या वस्तू या व्यक्तीकडून बनवून घेऊ शकता, त्यासाठी एका ट्रेनवर त्याने स्वतःचा नंबरदेखील लिहून ठेवला आहे.