सध्या विमान कंपन्याबाबतच्या अनेक चांगल्या वाईट बातम्या चर्चेत आहे. काही विमान कंपनीच्या पायलटने प्रवाशांसाठी अनोख्या अंदाजात दिलेल्या सूचनांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तर काही विमान कंपनीच्या क्रूनी प्रवाशांना योग्य सुविधा उपलबध न करुन दिल्याच्या बातम्याही प्रसिद्ध होत आहेत. अशातच आता एका अमेरिकन विमान कंपनीने अनोखी आणि उत्तम अशी एक घोषणा केली आहे, ती सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील फ्रंटियर एअरलाइन्स (Frontier Airlines) या विमान कंपनीने अशी घोषणा केली आहे की, जो कोणी तीन भटक्या मांजरीची पिल्लं दत्तक घेईल त्याला फ्रंटियर एअरलाइन्सकडून मोफत विमान प्रवासाचं कूपन दिलं जाईल. याबाबतची माहिती न्यूयॉर्क पोस्टने दिली आहे. डेनवरमधील वाहकाने व्यक्तीने मागील आठवड्यात एक ट्विट केलं होत त्यामध्ये त्यांनी म्हटलं होत की, “आम्ही @Delta आणि @Spirit ला दत्तक घेणार्‍यांना प्रत्येकी दोन फ्लाइट व्हाउचर आणि Frontier ला दत्तक घेणाऱ्यांना ४ व्हाउचर दान करायला आवडेल.”

हेही पाहा- मेडिकलमध्ये ORS घ्यायला गेलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल

विशेष म्हणजे राज्यातील सर्वात मोठे प्राणी अभयारण्य असलेल्या लास वेगासच्या अॅनिमल फाउंडेशनने अलीकडेच फ्रंटियर, स्पिरिट आणि डेल्टा नावाच्या तीन्ही मांजरीच्या पिल्लांना दत्तक घेतलं आहे. सध्या ही मांजरीची पिल्लं एक ते दोन आठवड्यांचे असल्याचे सांगितलं जात आहे. तर पिल्लांना दत्तक घेतलेल्या आश्रमाने ट्विट केलं की, “आमच्या आश्रमामध्ये नवीन मांजराची पिल्लं आली आहेत, स्पिरिटचे नाव साउथवेस्ट ठेवले होते, परंतु अलीकडील घटनांमुळे, आमच्या मार्केटिंग टीमने आम्हाला ते बदलण्याची विनंती केली होती.” असं आश्रमाच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हेही पाहा- नववर्षाचा उत्साह एवढा की किस करताना पडदा ठेवला उघडा; मरीन ड्रायव्हवरील ‘तो’ Video होतोय व्हायरल

विमान प्रवासाची कूपन आश्रमामध्ये पोहचवण्यात आली आहेत, परंतु या महिन्याच्या अखेरीस मांजरीचे पिल्लं दत्तक घेईपर्यंत ते त्यांना दिले जाणार नसल्याचं एअरलाइनच्या प्रतिनिधीने सांगितलं आहे. तर फ्रंटियरच्या प्रवक्त्या जेनिफर डे ला क्रूज यांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितलं की, “दत्तक संस्थेकडे कूपन आहेत आणि त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

संस्थेने सूचित केल्याप्रमाणे मांजरीचे पिल्लू अद्याप दत्तक घेण्यास थोडे लहान आहेत, परंतु एक किंवा त्यापेक्षा जास्त महिन्यात पिल्ल दत्तक घेण्यासाठी तयार होतील.” दरम्यान, विमान कंपनीच्या आणि आश्रमाच्या दोन्हीच्या कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे. शिवाय प्राणी प्रेमींनीही कंपनीच्या अशा ऑफरमुळे लोक प्राण्यांना दत्तक घेतील असं म्हटलं आहे. त्यामुळे विमान कंपनीने दिलेली ही ऑफर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.