Dance Viral Video: सोशल मीडियावर सतत नवनवीन गोष्टींचा ट्रेंड बदलेला पाहायला मिळतो. ज्यात कधी एखादा डायलॉग, तर कधी एखादं गाणं प्रचंड चर्चेत येतं. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’,‘सुसेकी’, ‘तौबा तौबा’ यांसारखी अनेक गाणी खूप चर्चेत आली. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर ‘नाच गं घुमा’ हे मराठमोळं गाणं खूप चर्चेत आहे. ज्यावर अनेकांनी रील्स बनवलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. आता या गाण्यावर एका चिमुकलीने डान्स केलेला आहे. जो पाहून नेटकरीही तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

हल्ली लहान मुलांचेदेखील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आताच्या लहान मुलांचे अभ्यासापेक्षा सोशल मीडियाच्या ट्रेंडवर अचूक लक्ष असते. एखादे नवीन गाणे आले की ते त्यांना नेहमीच तोंडपाठ असते. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील अशाच एका लहान गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यावर ती ‘नाच गं घुमा’ या मराठमोळ्या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडीओतील चिमुकली तिच्या परदेशातील घरामध्ये डान्स करत आहे. यावेळी तिने नाकात नथ आणि गळ्यात मराठमोळ्या पद्धतीची ढुशीदेखील घातलेली आहे. गाणं सुरू होताच चिमुकली नाचायला सुरूवात करते. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स आणि एक्सप्रेशन्स पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत जवळपास तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर नऊ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा: ‘मलापण शिकव ना!…’ गृहपाठ करणाऱ्या चिमुकलीच्या कुशीत बसला श्वान अन् केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हे बॉण्डिंग..”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘खूप सुपर डान्स’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘छान डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘एकदम मस्तच.’ तर इतर अनेक जण चिमुकलीचं कौतुक करताना दिसत आहेत.

Story img Loader