Viral Video : आई मुलाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आपुलकी दिसून येते. आई ही मुलांचा पहिला गुरु असते. ती आपल्याला अशा काही गोष्टी शिकवते ज्या आयुष्यात नेहमी कामी येतात. तिने शिकवलेल्या गोष्टींमुळे क्षणो क्षणी आपल्याला तिची आठवण येते. आईने शिकवलेली प्रत्येक गोष्ट जीवनाच्या वाटेवर कधी कुठेतरी कामे पडते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण भाकरी थापताना आणि चुलीवर भाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही भावूक व्हाल. काही लोकांना कदाचित त्यांच्या आईची आठवण येईल. (a young man making bhakari on chulha, Video Viral)
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. हा तरुण चुलीसमोर बसून भाकरी बनवताना दिसत आहे. तो भाकरी थापताना आणि भाजताना दिसतोय. तो अतिशय मन लावून भाकरी तयार करत आहे. या व्हिडिओवर लिहिलेय, ” आईने शिकवलेली कला कधीच उपाशी मारत नाही.” या तरुणाला कदाचित त्याच्या आईने भाकरी शिकवली असावी. तुम्हाला भाकरी बनवता येते का? आणि कोणी तुम्हाला भाकरी बनवायला शिकवली? हा व्हिडीओ पाहून तुम्हाला त्या व्यक्तीची कदाचित आठवण येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
Hebaghbhava या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शिकवलेली कला कधीच उपाशी मारत नाही.”
हेही वाचा : ‘बालपण हे असं जगता आलं पाहिजे…’ मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरं आहे भावा” तर एका युजरने लिहिलेय, “मुलींसाठी मॅरेज मटेरियल आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “अशी मुल नाहीत बनवून खाणारी, सगळे हॉटेलला जाणारी आहेत” एक युजर लिहितो, “आई-वडिलांचे उपकार कधीच विसरू नाही शकणार कोणी” तर एक युजर लिहितो, “खरं आहे भाऊ वयाच्या आठव्या वर्षी आईने आम्हाला पूर्ण स्वयंपाक करायला शिकवला. आज आई कुठे गेली आहे तर मी सगळा स्वयंपाक करतो” एक युजर लिहितो, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.