Viral Video : भारतीय संगीतातील एक प्राचीन व प्रमुख तंतुवाद्य म्हणून वीणा हे वाद्य ओळखलं जातं. वीणा हे एक तारवाद्य असून, शास्त्रीय संगीतामध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतं. मंदिरातील धर्मग्रंथ, जुन्या काळातील रेखाचित्रं, तसेच नारदमुनी आणि सरस्वती यांच्या हातात आपण वीणा पाहिली आहे. तसेच कोलंबियाची गायिका शकिरा हिचे ‘वाका वाका’ (Waka Waka ) हे गाणं जगभरात प्रसिद्ध आहे. या गाण्याची तरुणांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. तर तुम्ही कधी वाका वाका हे गाणं वीणावर सादर केलेलं पाहिलं आहे का? आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. वाका वाका हे गाणं आणि वीणा वाद्याचा उपयोग करून कलाकारानं एक वेगळीच कला सादर केली आहे.

आजवर तुम्ही वाका वाका या गाण्याची फोनची रिंगटोन ऐकली किंवा डान्स व्हिडीओ पाहिला असेल. पण, या संगीतकारानं वीणा वाद्यावर हे गाणं सादर करून अनेकांची मनं जिंकली आहेत. संगीतकार सुरुवातीला वीणा घेऊन बसतो आणि त्याच्या कलेनं वाका वाका या गाण्याच्या सादरीकरणाची अप्रतिम कामगिरी करतो. गाणं सादर करताना संगीतकाराचे हावभाव आणि वाद्यावर वाजणारं हे गाणं तुम्हालाही मंत्रमुग्ध करील. मग तुम्ही या गाण्याचं सादरीकरण पुन्हा पुन्हा ऐकाल एवढं नक्की… वाका वाका हे गाणं वीणावर कशा प्रकारे सादर केलंय हे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

हेही वाचा… काय सांगता! देशात अशी एक शाळा जिथे फी नाही तर प्लास्टिकच्या बाटल्या देऊन मिळतेय शिक्षण; पाहा Video

व्हिडीओ नक्की बघा :

वाका वाका गाणं वीणावर केलं सादर :

‘वाका वाका’ गाणं फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी एक आहे. कोलंबिया गायिका शकिरानं या गाण्याला आवाज दिला होता. तसेच या गाण्याचा यूट्युबवर व्हिडीओदेखील आहे; ज्यात शकिराने जबरदस्त डान्स स्टेप्स करीत अनेकांची मनं जिंकली आहेत. तसेच हे गाणं कुठेही ऐकू आलं की, तुमच्यातील अनेक जण गाणं गुणगुणतात आणि गाण्यावर ठेका धरताना दिसून येतात. शकिरानं गायलेलं हे गाणं या कलाकारानं त्याच्या रचनेनं पुन्हा रीक्रिएट केलं आहे आणि सध्या ते सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे.

वाका वाका हे गाणं वीणावर सादर करणाऱ्या संगीतकाराचं नाव ‘महेश प्रसाद’ असं आहे. त्याचप्रमाणे या गाण्याची झलक संगीतकाराने @maheshprasadal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. ‘वाका वाका’ गाणं वीणावर अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. तसेच व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांना हे गाणं आवडलं असून, “शास्त्रीय वाका वाका’, ‘गाणं ओरिजिनल गाण्यापेक्षा खूप चांगलं आहे”,असं काही जण म्हणत आहेत. तर अनेक जण भारतीय शास्त्रीय संगीताची प्रशंसा करीत आहेत. तसेच या सादरीकरणाची फोनची रिंगटोन बनवणार, असंदेखील एक युजर म्हणताना दिसत आहे. बरेच जण संगीतकाराच्या कल्पकतेला दाद देताना कमेंटमध्ये दिसून येत आहेत.

Story img Loader