वन्यप्राणी निवासी भागात फिरत असल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या आहेत. असे खूप व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील, पण जर अस्वल आपल्या मुलांसह लग्न समारंभात पोहोचले तर? ही घटना खूपच आश्चर्यकारक वाटते ना. परंतु, इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अस्वल आपल्या दोन मुलांसह लग्न समारंभात पोहोचतो. हा व्हिडीओ छत्तीसगडचा आहे.

अस्वलाचे कुटुंब लग्नाला पोहोचते

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात लग्नाची रिसेप्शन पार्टी सुरू होती. यादरम्यान एक अस्वल आपल्या दोन मुलांसह लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचला. व्हिडीओमध्ये तुम्ही अस्वल आणि त्याची मुले स्टेजवर आरामात फिरताना पाहू शकता. अस्वल स्टेजवर जाते, वास घेते आणि मागे वळते, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
Grandparents got married again In 60th Wedding Anniversary
‘एक नात आयुष्यभराच…’ गजऱ्याच्या मुंडावळ्या बांधून आजी-आजोबा उभे राहिले लग्नाला; VIRAL VIDEO एकदा बघाच
WhatsApp Wedding Invitation Scam Scammers Are Using New Tricks To Steal Your Money
व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली लग्नपत्रिका डाऊनलोड करताय? मग सावधान, अन्यथा तुमचा मोबाईल हॅक झालाच म्हणून समजा
Japanese man celebrates sixth marriage anniversary
मुलींचे नकार पचवून वैतागल्याने शेवटी ‘बाहुली’शी केलं लग्न! अजब प्रेमाची गजब कहाणी; पाहा VIDEO

(हे ही वाचा: सात मिनिटांसाठी ‘हा’ युट्युबर बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! एलोन मस्कलाही टाकले मागे)

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एक अस्वल आपल्या दोन मुलांसह लग्नाच्या रिसेप्शनच्या स्टेजवर पोहचला तर?’ हा व्हिडीओ छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील आहे. जंगले तोडली गेली आणि लोकसंख्या स्थिरावली. आता दर आठवड्याला वर्तमानपत्रात बातम्या छापून येतात – जंगली अस्वल लोकवस्तीच्या भागात पोहोचले!

(हे ही वाचा: ऑनलाइन क्लासचा प्रभाव! मुलाने ‘या’ इंग्रजी शब्दाला दिले नवीन नाव, हा Viral Video एकदा बघाचं)

(हे ही वाचा: सात मिनिटांसाठी ‘हा’ युट्युबर बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! एलोन मस्कलाही टाकले मागे)

IFS अधिकाऱ्याने दिली माहिती

सुदैवाने, तेथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांपैकी कोणालाही इजा झाली नाही, कारण अस्वल आणि त्याची मुले येण्यापूर्वीच सर्व पाहुणे पार्टीतून निघून गेले होते. हा व्हिडीओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या एका सहकाऱ्याला विचारते की अस्वल हल्ला करेल का? यानंतर तो स्वत: आपल्यावर हल्ला करणार नाही, अशी आशा करतो असे म्हणताना ऐकू येते. शेवटी, अस्वलाचे कुटुंब कोणतीही हानी न करता निघून जाते.