Viral Video: मित्र-मैत्रिणींचा, कुटुंबातील एखाद्या सदस्याचा वाढदिवस असेल तर आपण हमखास केक कापतो. वाढदिवस असो किंवा एखादी आनंदाची बातमी असो, केक कापणं हा जणू एक ट्रेंड सुरू झाला आहे. पण, काही जण या आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या केकचा दुरुपयोग करतात. ज्यांचा वाढदिवस असेल त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर केक लावतात किंवा जमलेल्या मंडळींवर फेकतात; यामुळे केकची नासाडी होते. पण, आज सोशल मीडियावर या गोष्टीसाठी एक उपाय शोधून काढला आहे. व्हायरल व्हिडीओत एका पोलिस अधिकाऱ्याने अनोख्या पद्धतीत स्वतःच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केलं आहे.
बंगळुरू शहर पोलिस आयुक्त बी. दयानंद यांचा वाढदिवस असतो. त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक नाही तर चक्क कलिंगड ठेवलेले असते. काचेच्या टेबलावर एक कलिंगड आणि त्याच्यावर काही मेणबत्या लावलेल्या असतात. कलिंगडावर लावलेल्या मेणबत्त्या फुकून व कलिंगड कापून हा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
बी. दयानंद बंगळुरू शहर पोलिस आयुक्त यांनी केकऐवजी कलिंगड निवडून एक आरोग्यदायी पर्याय शोधून काढला आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, ओपन गार्डनमध्ये या कार्यक्रमाचे खास सेलिब्रेशन सुरू आहे. त्यांच्या या खास सेलिब्रेशनमध्ये अनेक जण सहभागी झालेले सुद्धा दिसून येत आहेत. तसेच या अनोख्या कल्पनेची जमलेली मंडळी टाळ्या वाजवताना आणि त्याचा जयजयकार करताना दिसले आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @nagarjund या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी या अनोख्या कल्पनेचं कौतुक, तर पोलिस अधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. एकूणच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.