सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमानाचा पायलट रक्ताने माखलेला दिसत आहे, तर कॉकपिटची खिडकी तुटली असून काचेला एक मोठा पक्षी लटकलेला दिसत आहे. हवेत उडणाऱ्या विमानाला अचानक या पक्षाने धडक दिली होती, त्यामुळे पक्षी मोठ्या प्रमाणात जखमी झाला आणि त्याच्या शरीरातील रक्त पायलटच्या शरीरावर पडल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत, हवेत उडणाऱ्या विमानाच्या कॉकपिटमध्ये एक मोठा पक्षी लटकत असल्याचं दिसत आहे. पक्ष्याच्या धडकेने कॉकपिटचे नुकसान झाले असून पायलटचे कपडेदेखील रक्ताने माखले आहेत. इतकेच नव्हे तर पायलटच्या चेहऱ्यावरदेखील या रक्ताचे डाग दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहायला खूप भीतीदायक दिसत आहे. मात्र, वैमानिकाने अतिशय हुशारीने कोणताही अनर्थ न होऊ देता हे विमान सुरक्षित जमिनीवर उतरवलं आहे.

हेही पाहा- बुक केलेली राईड कॅन्सल केली नाही म्हणून ड्रायव्हरची दादागिरी, रिक्षा धडकवत मारहाण केल्याचा व्हिडीओ Viral

@aviationbrk नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हाव्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे “इक्वेडोरच्या लॉस रिओस प्रांतात एका महाकाय पक्ष्याने विंडशील्डला धडक दिल्यानंतर पायलटने त्याचे विमान सुरक्षितपणे उतरवले. या घटनेत एरियल वैलेंटे जखमी झाले नाहीत.” तर हा व्हिडिओ पाहून लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका युजरने लिहिले की, पायलटने समजूतदारपणा दाखवत आपल्या कौशल्याने विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवले. तर आणखी एका युजरने लिहिले की, “या पायलटने विमानावरील ताबा गमावला नाही त्यामुळे विमान सुरक्षितपणे उतरवले, याबद्दल त्याला बक्षीस द्यायला हवा. कारण त्याने लाखो डॉलर्सच्या विमानासह अनेकांचे जीव वाचवले.” तर एका नेटकऱ्याने लिहिलं की, पायलट या पक्ष्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. तर काही लोकांनी पायलटचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. दरम्यान, विमानाला धडकणारा पक्षी कोणता आहे याची माहिती समोर आलेली नाही.