Rajgad Killa : समाजातील अंध, मुकबधिर आणि दिव्यांग बांधवाना नेहमी मदत करणे हे प्रत्येक सुजाण नागरीकाचे कर्तव्य आहे. या बांधवाना मदत करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे.प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर नयन संस्थेनेने ५० अंध बांधवांना स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडाची सैर करून आणली.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसवलेली, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला सर करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. मुंबई येथील ५० अंध बांधवांनी प्रजाकसत्ताक दिनी किल्ले राजगड सर करुन त्यांची इच्छा नयन संस्थेनी पूर्ण केला. यावेळी या बांधवांनी एक विलक्षण अनुभव घेतला. या बांधवांनी अवघ्या साडेतीन तासात ही मोहीम पूर्ण केली.

Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Peshwa Maratha sacking of the Sringeri math
Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!

अंध बांधव देवेंद्र पोन्नलगर दक्षिण भारतीय असूनही त्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर, प्रेम आणि महाराष्ट्राबद्दल प्रचंड जिव्हाळा आहे. त्याला स्वत:ला ट्रेकिंगची खूप आवड असून त्याने अनेक किल्ल्यांना भेट दिली आहे. आपल्याप्रमाणेच अंध व्यक्तींनाही महाराजांचे किल्ले अनुभवता यावे, त्यांना जीवन अनुभवण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने २०१० साली त्याने आणि रुईया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळून ‘नयन फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली.

हेही वाचा : VIDEO : “इंग्रजी भाषेत टोमॅटोला म्हणतात…” आजीबाईचा भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

संस्थेच्या स्थापनेनंतर दरवर्षी २६ जानेवारीला अंध बांधवांसाठी ट्रेक आयोजित केला जातो. पहिल्या वर्षी शिवनेरी गडावरच्या ट्रेकमध्ये १६ अंध मुलं सहभागी झाली होती. शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर जाण्याचा अनुभव या मुलांना आयुष्यात खूप काही देऊन गेला होता. त्यानंतर ट्रेकला अंध बांधवांचा प्रतिसाद वाढतच गेला. दुसऱ्या वर्षी रायगडावरच्या ट्रेकमध्ये ६० तर तिसऱ्या वर्षी लोहगडच्या ट्रेकला सहभागी मुलांचा आकडा ८० वर होता. या वर्षी २६ जानेवारीला ते राजगडावर गेले होते.

nayan_foundation या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन अंध बांधवांबरोबरचा एक फोटो शेअर करत या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तू चाल पुढं… आपण डोळसपणे अनेकदा धडपडतो, पण मग डोळ्यासमोर पसरलेल्या काळ्याकुट्ट अंधारात अंध व्यक्ती आपला मार्ग कसा शोधत असतील याचे सामान्य माणसाला नेहमीच आश्चर्य वाटते. अंध व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकत नाही असा त्याचा समज असतो. मात्र हा समज चुकीचा आहे. दिव्यांग व्यक्तींच्या शारीरिक कमतरतेची भरपाई देवाने मानसिक बळ देऊन केलेली असते. त्यांची जिद्द आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन डोळस माणसालाही लाजवेल असा असतो. इच्छाशक्तीच्या जोरावर ते सुदृढ माणसाच्या बरोबरीचे आयुष्य जगू शकतात. गरज असते ती आपण त्यांच्यावर विश्वास दाखविण्याची, त्यांना प्रोत्साहन देण्याची. अंध बांधवांना जीवनात थरार अनुभवण्याची संधी मिळवून देणाऱ्या ‘नयन फाऊंडेशन’ने नेमके हेच केले आहे.”