सोशल मीडियावर बॉस आणि कर्मचाऱ्यांमधील अनेक किस्से व्हायरल होत असतात. यातील काही मनोरंजक असतात तर काही संतापजनक. सध्या सोशल मीडियावर एका कंपनीतील कर्मचारी आणि त्याच्या बॉसमधील चॅटींग व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्याला सुट्टी असतानाही कामावर बोलावल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर, अनेक कंपन्यांमध्ये असे काही बॉस असतात, जे त्यांच्या कर्मचार्‍यांना सुट्टीदिवशीही कामावर बोलवातात. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना इच्छा नसताना कामावर जावं लागतं. कारण बॉसचं ऐकलं नाही तर त्यांची नोकरी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ते इतर सर्व कामे बाजूला ठेवून ऑफिसला जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या अशाच एका कर्मचाऱ्यासोबत घडलेला प्रकार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बॉस कर्मचाऱ्याला त्याच्या सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावत दिसत आहे. बॉसने कर्मचाऱ्याला रात्री १० वाजता मेसेज केला की त्याला दुसऱ्या दिवशी ऑफिसला यायचं आहे. मेसेज वाचून कर्मचाऱ्याला राग येतो आणि बॉसवर भडकतो शिवाय तो नोकरीचा राजीनामाही देतो. कर्मचारी आणि त्याचा बॉसमधील चॅटींगचा स्क्रीनशॉट Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

हेही वाचा- “घरी मी एकटाच…” मदत मागणाऱ्या मुलीला पोलिसाने मध्यरात्री बोलावलं घरी, तिने नकार देताच…, दोघांमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट Viral

तू सिंगल आहेस, कामावर ये –

व्हायरल होत असलेल्या चॅटींगमध्ये बॉस कर्मचाऱ्याला म्हणतो, “उद्या तुझी गरज आहे, त्यामुळे तुला उद्या सकाळी ७ वाजताची शिफ्ट करावी लागेल. त्यामुळे ६:१५ पर्यंत ऑफिसला ये. तू मेसेज वाचला आहेस, आता उद्या ये ऑफिसमध्ये भेटू.” बॉसच्या मेसेजला रिप्लाय देताना कर्मचाऱ्याने लिहिलं, “मी उद्या येऊ शकत नाही. तुम्ही ब्रायनला याबद्दल विचारले का?” बॉस म्हणतो, “ब्रायन विवाहित आहे, त्याला मुले आहेत. मी त्याला इतक्या शॉर्ट नोटिसवर बोलवू शकत नाही. तू सिंगल आहेस तरी का येऊ शकत नाहीस?” त्याला उत्तर देताना हा कर्मचारी म्हणतो की, “या आठवड्यात मला एकच सुट्टी मिळाली असून या दिवशी मी खूप प्लॅन केले आहेत. तुम्हाला जास्तच गरज असेल तर मी उद्या दुपारी कामावर येईन.”

यावर बॉस म्हणतो, “उद्या सकाळीच तुझी गरज आहे आणि उद्या दुपारी जास्त काम नाही, जे काही हे ते फक्त उद्या सकाळी आहे आणि तू उद्या येऊ शकत नाहीस असा काय प्लॅन केला आहेस?” यावर कर्मचारी उत्तर देतो, “उद्या सकाळी मला एका मित्राला मदत करायची आहे आणि माझे आणखी काही कामे आहेत. तुम्ही आता मेसेज करून मला ऑफिसला बोलवता आहात. मी इतके दिवस तुमच्यासोबत काम करत आहे आणि मी नेहमी माझ्या कामाशी प्रामाणिक असतो.”

हेही वाचा- याला म्हणतात नशीब! जन्मानंतर २ दिवसातच मुलगी बनली कोट्यवधींची मालकीण, आलिशान घर, महागड्या गाड्या अन्…

मात्र या मेसेजनंतरही बॉस कर्मचाऱ्याचे दिलेलं कारण पटत नाही, तो कर्मचाऱ्याला विचारतो, “तुझ्या मित्राला मदत करण्यासाठी दुसरं कोणी सापडले नाही का? यापुढे काहीही बोलताना, विचार करूनच बोलत जा” हे ऐकून कर्मचाऱ्याला खूप राग येतो आणि तो राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आणि बॉसला मेसेजमध्येच सांगतो की, “मी यापुढे तुमच्यासोबत काम करू शकत नाही आणि माझा नोटिस पीरियड संपल्यानंतर मी निघून जाईन. सोमवारी भेटू.” हे व्हायरल चॅट पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्यचकित झाले असून ते या बॉसच्या वागणुकीवर संताप व्यक्त करत आहेत. मात्र काही नेटकऱ्यांनी हे चॅटींग स्क्रिप्टेड असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The boss asked to come to work on a holiday the employee took an extreme decision the chat between the two went viral jap
Show comments