लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, भारतात तरुणांची संख्याही मोठी आहे. अशावेळी नोकरी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. लोकसंख्या वाढीच्या समस्येमुळे नोकरी मिळणेही कठीण झाले आहे. पण नोकरी मिळालीच तर ती मनासारखीही नसते. एखाद्या ठिकाणी भरती असेल तर तिथे हजारो उमेदवार अर्ज करतात. या परिस्थितीत बहुतांश अर्ज कचऱ्याच्या डब्ब्यातच जातात. या समस्येपासून वाचण्यासाठी आणि नोकरी मिळवण्यासाठी एका तरुणाने एक भन्नाट शक्कल लढवली आहे.
आजकाल नोकरी शोधणे सोपे नाही. तुम्ही ज्या नोकरीसाठी अर्ज करता त्या नोकरीतून बहुतेकदा नकार प्राप्त होतात. कधी-कधी बायोडाटा भरती करणाऱ्यांपर्यंत पोहोचतही नाही. अशा परिस्थितीत एका व्यक्तीला यासाठी सर्वोत्तम कल्पना सुचली. ट्विटर युजर अमन खंडेलवालने कार्यालयातील बॉसचे लक्ष वेधण्यासाठी झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून वेषभूषा केली आणि पेस्ट्रीचा बॉक्स हातात घेऊन ते स्वत: प्रत्येक कार्यालय प्रमुखापर्यंत पोहचवले.
लहानग्या कुत्र्याचा गोंडस बंड पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड!’
अमन खंडेलवाल नावाच्या या मुलाने त्याची क्रिएटिव्ह आयडिया लोकांसोबत शेअर केली. त्याने ट्विटरवर त्याचा झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा लूक शेअर केला आहे. तसेच त्याने पेस्ट्री बॉक्सचा फोटोही शेअर केला आहे, ज्यावर संदेशात लिहिले होते की ‘अनेक रिझ्युमे शेवटी कचरापेटीमध्ये जातात, माझा तुमच्या पोटात आहे.’ तसेच कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “मी झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या ड्रेसमध्ये माझा बायोडाटा बेंगळुरूमधील अनेक स्टार्टअपला पाठवला आहे. हा @peakbengaluru क्षण आहे का?”
अमनच्या या कृत्याला लोकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी याला सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक म्हटले आहे. एकाने लिहिले की ‘ही कल्पना फक्त मलाच विचित्र वाटली की इतर कोणालाही असे वाटले?’ तसेच एका यूजरने लिहिले की, ‘झोमॅटो किंवा स्विगीच्या कपड्यांमध्ये कोणत्याही ऑफिसची सुरक्षा व्यवस्था उद्ध्वस्त केली जाऊ शकते का?’
आतापर्यंत झोमॅटोने या ट्विटवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अमनने यापूर्वीही असे कृत्य केल्याचे आणखी एका ट्विटवरून समोर आले आहे. त्याचवेळी, एका यूजरने खुलासा केला की, ‘अमेरिकेत यापूर्वीही असे घडले आहे, तिथून अमनने ही कल्पना चोरली आहे.’