Viral Video : हल्ली सोशल मीडियाच्या जगात प्रत्येक जण मोबाईलवर दिसतो. प्रत्येक जण रील बनवताना दिसतो. कधी कोणी डान्स करतानाची रील शेअर करतात तर कधी कोणी गाणी म्हणतानाची रील शेअर करतात. काही लोक त्यांना येत असलेल्या विविध कला दाखवताना दिसतात. रिलच्या नादात अनेक जण जीवाची पर्वा न करता जीवघेणे स्टंट करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा उंचावरून उडी मारताना दिसतो. पुढे जे काही होते, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a boy jumps from the terrace for the reel he got Severe neck injury stunt video goes viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चार मुले घराच्या गच्चीवर उभे आहेत. त्यातला एक मुलगा उंचावरून खाली उडी मारताना रील बनवताना दिसतो. जेव्हा तो उंचावरून खाली उडी मारतो तेव्हा तो धाडकन खाली पडतो आणि त्याला मानेला गंभीर दुखापत होते. दुखापती एवढी गंभीर असते की त्याला जागेवरून उठता येत नाही. तेव्हा मुले धावत येतात आणि त्याला हाताने उठवण्यास मदत करतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : तरुणीची एक चूक अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना तरुणीबरोबर घडलं असं की..,पाहा मृत्यूचा थरारक VIDEO 

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : जबाबदारीला वय नसतं! एकीकडे शिक्षणाची भूक, तर दुसरीकडे पोटाची भूक; चिमुकल्याचा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

@PalsSkit या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जीव गेला तरी चालेल पण रील नको जायला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मान मोडली त्या मुलाची” तर एका युजरने लिहिलेय, “फक्त हेच बाकी होते पाहायचे” आणखी एका युजरने लिहिलेय, “बापरे, “किती धोकादायक”

यापूर्वी असे अनेक व्हि़डीओ व्हायरल झाले आहेत. रिल्सच्या आहारी जाऊन अनेक जण जीव धोक्यात टाकताना दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये चालत्या ट्रेनमध्ये तरुणी दरवाज्याजवळ उभी राहून रील बनवताना दिसली होती. त्या व्हिडीओवर लोकांनी खूप टीका केली होती.