५ सप्टेंबर हा दिवस देशभरात सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक दिनानिमित्त अनेक विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा देतात. या दिवशी ते शिक्षकांना काहीतरी भेट किंवा सरप्राईज देतात. शिवाय विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून शिक्षकही खूश आहेत. पण काही अतिउत्साही विद्यार्थी असे असतात जे शिक्षकांचे कौतुक करतानाही असं काही करतात., ज्यामुळे त्यांना कौतुकाची थाप मिळण्याऐवजी मार भेटतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका विद्यार्थ्याचा मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो जुना असला तरी पुन्हा मोठ्या प्रमाणात खूप शेअर केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये एक विद्यार्थी शिक्षक दिनाचं सेलिब्रेशन करत असतानाच शिक्षक त्याला मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडीओतील मुलगा शिक्षक दिनाच्या उत्सवाच्या उत्साहात इतका बेभान होतो की तो शिक्षकांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारायला सुरुवात करतो. त्याच्या या कृत्यामुळे शिक्षक रागवतात आणि मुलाला पकडून त्याच्या पाठीवर मारहाण करतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी अशा शिक्षकांनाही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा अशा प्रतिक्रिया देत आहेत.

हेही पाहा- “कोई तो मेरा भी सचिन होगा” विराटची पाकिस्तानी फॅन भारतीय तरुणांवर नाराज, VIDEO शेअर करत व्यक्त केली खंत, म्हणाली…

काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये, एका वर्ग फुग्यांनी सजवल्याचं दिसत आहे. शिक्षक खुर्चीवर बसले आहेत. एकंदरीत उत्सवाचे वातावरण असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हे सर्व विद्यार्थी बसून शिक्षकाकडे बघत आहेत. यावेळी अचानक एक मुलगा शिक्षकांवर स्प्रे मारायला सुरुवात करतो. जो स्प्रे लोक लग्न आणि पार्ट्यांमध्ये खूप वापरतात. हा विद्यार्थी उत्साहाच्या भरात शिक्षकांच्या तोंडावर स्प्रे मारायला सुरुवात करताच ते चिडतात आणि त्या मुलाची कॉलर पकडून त्याला स्वतःकडे ओढतात, टेबलवर झोपवतात आणि त्याच्या पाठीवर जोरात मारायला सुरुवात करतात.

हा व्हिडिओ ५ सप्टेंबर रोजी @HasnaZaruriHai नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या खूप व्हायरल होत आहे. शिवाय व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या कमेंट देखील करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “गुरुजींचे प्रेम अपार आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं, “आजच्या दिवशी आशीर्वाद मिळाला आहे.”