काहींना बाईकवर स्टंट करण्याची इतकी हौस असते की, त्यांना स्वतःच्या जीवाचीही पर्वा नसते. कधी हायवेवर, तर कधी डोंगराळ रस्त्यांवर भरधाव दुचाकी चालवतात. अन् अशा स्टंटमुळे अनेक वेळा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. पण, असेही काही लोक आहेत की, जे बाईक स्टंट करताना इतरांचा जीव घेण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. कधी नकळत, तर कधी ते जाणूनबुजून इतरांना अशा स्टंटमध्ये गुंतवून घेतात. आम्ही असाच एक व्हिडीओ दाखविणार आहोत; ज्यामध्ये एक व्यक्ती जमिनीवर पडलेल्या मुलाच्या डोक्यावरून बाईक नेत आहे. मुलगा डोके धरून वेदनेने रडू लागला. डोके भोपळ्यासारखे फुटल्यासारखे वाटले. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचेही हृदय हादरेल.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला जवळपास अनेक लोक बसलेले दिसत आहेत. त्या सर्वांच्या मधोमध एक मुलगा दोन विटांच्या मध्ये डोके ठेवून पडला होता. जणू तो सर्कसचाच भाग आहे, असे वाटते. बाईक चालविणारा लाल शर्ट घातलेला मुलगा जमिनीवर पडलेल्या हिरव्या टी-शर्टमधील मुलाकडे पटकन सरकतो. काही वेळातच तो हिरवा टी-शर्ट घातलेल्या माणसाच्या डोक्यावरून बाईक नेतो आणि पुढे जातो. बाईक त्या मुलाच्या अंगावरून जाताच तो वेदनेने ओरडतो. त्याचे डोके त्याच्या हातांनी धरतो. त्याची कवटी फुटल्यासारखे वाटते.
(हे ही वाचा : ‘शिकार करो या शिकार बनो’ गायीचा जीव वाचवण्यासाठी बैलाने केला दोन सिंहांचा मोठा गेम, तुफान लढतीचा व्हिडीओ व्हायरल)
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हिरवा टी-शर्ट घातलेल्या मुलाला वेदना होत असतानाच एक लहान मुलगी आणि एक तरुण त्याच्या जवळ धावत येतात. दुचाकीस्वाराला काय झाले ते समजत नाही. तोही घाबरलेला दिसतोय. तर, हिरव्या टी-शर्टमधील मुलाचे डोके दुखत आहे. मात्र, पुढे काय झाले याचा उल्लेख व्हिडीओमध्ये करण्यात आलेला नाही. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; जो @biki_sk83777 नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ३१ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
येथे पाहा व्हिडिओ
या व्हिडीओवर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. राजन नावाच्या युजरने लिहिले आहे, “विनोद करताना त्याचे डोके फुटले.” तर राजेश नावाच्या युजरने लिहिलेय, “भाऊ, लाइक्ससाठी असा धोका पत्करू नका; ज्यामुळे तुमचा जीव जाऊ शकतो.” एका युजरने लिहिलेय, “भाऊ, असे नाटक करू नका. कुठेतरी दुकानात काम करा. जीव वाचतील.” मात्र, जेव्हा आम्ही हे इन्स्टाग्राम अकाउंट तपासले तेव्हा आम्हाला आढळले की, ही मुले सोशल मीडियावर असेच व्हिडीओ शेअर करतात. असे अनेक धोकादायक व्हिडीओ या प्रोफाइलवर पाहायला मिळतील.