‘ऐकावं जनाचं करावं मनाचं’ ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. घरातली जेष्ठ मंडळी तर हे वाक्य सारखं बोलून दाखवतात. म्हणजे सर्वांचं ऐका पण तुमच्या मनाला पटेल तेच करा. पण तरी देखील काही मंडळी मित्र-मंडळींच्या नादाला लागतात अन् नको ते करून बसतात. असाच एक गंमतीशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल काय गरज होती का मित्रांच्या नादाला लागायची. सध्या प्रपोज करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय.
जेव्हा एखादी व्यक्ती कोणाच्या तरी प्रेमात पडते तेव्हा तिला किंवा त्याला प्रपोज कसे करायचे, असे अनेक प्रश्न त्या व्यक्तीला पडतात. यामध्ये मित्रांची खूप मदत होते. अनेकजण सहसा मित्रांचाच सल्ला घेतात. मात्र हाच मित्रांचा सल्ला घेणं, मित्रांचं ऐकनं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. मित्रांनी सांगितलं जा तीला प्रपोज कर, तिला पण तू आवडतोस. मित्रांचं हे मस्करीतलं बोलणं त्यानं मनावर घेतलं आणि काल फ्रेंडशीप डे च्या दिवशी त्या तरुणीला प्रपोज केलं. मात्र त्यानंतर घडलं भलतंच. त्या तरुणीनं चक्क त्या तरुणाच्या कानाखाली लगावली, तसंच चपलेनेही मारायला निघाली होती.
यावेळी या तरुणाची अवस्था घाबरून खराब झाली, यावेळी त्याच्यात मित्राने हे सगळं मोबाईलमध्ये शूट केलं. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – मगरीला जेवण भरवणं महिलेला पडलं महागात; अचानक केला हल्ला अन्, पाहा थरारक Video
तसंच हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत, ज्या पाहिल्यानंतर तुम्हीही स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाही. एका यूजरने लिहिले आहे की, त्याला मोठा हिरो बनण्याची आवड होती, आता खूप मजा आली असेल. याशिवाय अनेकांनी विचित्र कमेंट्स केल्या आहेत. हा प्रोपोज त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील असे एका यूजरने लिहिले आहे.अशा गंमतीशीर प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या जात आहेत.