एखाद्या कार्यक्रमात, हॉटेल, बीच, खास ठिकाणी किंवा घरात सजावट करून जोडीदार सागळ्यांसमोर एकमेकांना प्रपोज करतात किंवा लग्नाची मागणी घालतात आणि हा दिवस आणखीन खास करतात. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका प्रियकराने प्रेयसी समोर अगदीच अनोख्या स्टाईलमध्ये आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. प्रियकराने बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच अर्थात शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये प्रेयसीला रस्त्यात प्रपोज केलं आहे.
बॉलीवूडचा २००८ मधील ‘रब ने बना दी जोडी’ या प्रसिद्ध चित्रपटातील ‘तुझ में रब दिखता है’ या गाण्यात अभिनेता शाहरुख खान काही विद्यार्थ्यांच्या जवळ एक-एक पोस्टर देतो. सगळ्या विद्यार्थ्यांनी पोस्टर हातात घेतल्यावर त्यावर अभिनेत्री अनुष्का शर्माचे सुंदर असे चित्र तयार होते. तर अगदीच अशा पद्धतीत जोडीदार तरुणीला भर रस्त्यात प्रपोज करतो. व्हायरल व्हिडीओ परदेशातील आहे. परदेशात रस्त्यावर लोकांची एकच गर्दी दिसते आहे. तसेच या सगळ्यात एक प्रियकर आपल्या प्रेयसीला प्रपोज करतो. तरुणाने कशाप्रकारे प्रपोज केले एकदा तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा :
छवी आणि पवन असे या जोडप्याचे नाव आहे. छवी ही तरुणी मॉडेल आहे. तर व्हिडीओत ‘तुझ में रब दिखता है’ हे गाणं सुरू होतं. प्रेयसी रस्त्यावर उभी असते. काही तरुण आणि तरुणी गाण्यावर स्टेप्स करतात. काही तरुण मंडळी चित्रपटात दाखवल्याप्रमाणे पोस्टर हातात घेऊन उभे असतात. प्रियकर शाहरुख खानप्रमाणे पोस्टरकडे हात दाखवतो आणि सर्व तरुण मंडळी हे पोस्टर उभं करतात आणि त्यावर प्रेयसीचे मुकुट घातलेले सुंदर चित्र दिसते आणि अशा प्रकारे शाहरुख खानची स्टाईल रिक्रिएट करून प्रियसीला जोडीदाराकडून प्रपोज केले जाते.
प्रेयसीने या प्रसंगी लेहेंगा, तर प्रियकराने कोट घातलेला असतो. तसेच हा खास क्षण शेअर करत तिने लिहिले की, मी नेहमीच बॉलीवूड चित्रपटासारखं माझं प्रेम असावे असे स्वप्न पाहिले होते. लोकांनी मला सांगितले की, हे सर्व फक्त चित्रपटांमध्ये घडते, वास्तविक जीवनात नाही.” तुझ में रब दिखता हैं हे माझे आवडते गाणे होते आणि विशेषत: हे दृश्य नेहमी माझ्या डोळ्यात पाणी आणते आणि जेव्हा @drpavkooner पवनने माझ्यासाठी ते रिक्रिएट केले तेव्हा मला अश्रू आवरता आले नाहीत; असे प्रेयसीने कॅप्शन लिहिले आहे. सोशल मीडियावर या क्षणाचे व्हिडीओ आणि फोटो @chhaviverg @drpavkooner यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत.