सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही आपणाला पोट धरुन हसवणारे असतात तर काही आपणाला आश्चर्याचा धक्का देतात. शिवाय व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये अनेक प्राण्यांचाही समावेश असतो. खरं तर, जंगली प्राण्यांपेक्षाही सापाला लोक जास्त घाबरतात. तसेच साप विषारी असेल किंवा तो अजगरासारखा विशाल असेल, तर अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. किंग कोब्रा, अजगरासारखे साप समोर दिसताच भल्या भल्यांचा थरकाप उडतो. पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला भल्यामोठ्या अजगराला न घाबरता हातात पकडताना दिसत आहे.
या महिलेनं भल्यामोठ्या अजगराला पकडल्यानंतर पुढे जे काही घडलं, ते पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल यात शंका नाही. महिलेने अजगराला पकडल्याचा हा व्हिडीओ shital_kasar_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये, “मारण्यापेक्षा वाचवून बघा आनंद दुप्पट मिळेल” असं लिहिलं आहे. तर या सापाशी संबंधित आणखी काही माहिती देखील कॅप्शनमध्ये दिली आहे. अनेकजण या व्हिडीओतील महिलेच्या धाडसाचं कौतुक करताना दिसत आहे.
महिलेने भल्यामोठ्या अजगराला पकडल्याचा व्हिडीओ आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर अनेक नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “तुम्ही माझ्यासाठी हिरो आहात.” तर आणखी एकाने लिहिलं, “हे खूपच भयानक आहे.”