देशभरात लग्नाचा सीजन सुरू झाला आहे. अनेकदा आपण लग्नाला गेलो की तिथे असे काहीतरी पाहायला मिळते. ज्याचं लोक कौतुक करतात तर काही गोष्टी अशा घडतात ज्यावर लोक खूप हसतात. असचं एका लग्नात अशी मजेशीर घटना घडली, जी पाहून लोक खूप हसत आहेत. खरंतर हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की तो पाहिल्यानंतरही तुमचं हसू आवरता येणार नाही.

नक्की काय झालं?

यावेळी, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, वधू आणि वर जेसीबीवर बसले आहेत. ते जेसीबीवरून पाहुण्यांच्या मधून एन्ट्री घेत होते. ते वर बसून एकमेकांशी बोलत असल्याचे दिसत आहे आणि यादरम्यान एक मजेदार घटना घडते. काही वेळेतच दोघेही जमिनीवर पडतात. हे दृश्य पाहिल्यानंतर तिथे बसलेले लोक प्रचंड हसले. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती सध्या तरी उपलब्ध नाही.

( हे ही वाचा: लहान मुलाच्या आधी कुत्राच शिकला ‘आई’ बोलायला; व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनीही वेगाने प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, लग्नात नातेवाईक आणि मित्रांच्या नागिन डान्सनंतर आणखी एक नजारा पाहा. त्याचवेळी आणखी एका युजरने सांगितले की, वधू-वर जेसीबीवर का बसले होते, हे मला समजले नाही.

( हे ही वाचा: लज्जास्पद! ‘कंबरेचा आकार,बेडवरील कपडे…’ मुलाची मॅट्रिमोनिअल साइटवरची जाहिरात व्हायरल )

( हे ही वाचा: Viral: तामिळनाडूमध्ये पावसात दोन सापांचा डान्स; झोहोच्या सीईओने शेअर केला व्हिडीओ )

हा व्हिडीओ ब्राईड स्पेशल नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तेव्हापासून हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच लोक याला प्रचंड पसंती देत ​​आहेत. मात्र, हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे हे समजू शकले नाही.

Story img Loader