लग्नातील सर्वात खास विधी म्हणजे वरमाळा सोहळा. वधू आणि वर (Groom & Bride) स्टेजवर सर्वांसमोर एकमेकांना हार घालतात. हा वरमाळा सोहळातील अनेक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये वराला वरमाळा घालण्याची वधूची स्टाईल पाहून उपस्थित लोक घाबरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय झालं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वधू-वर स्टेजवर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांच्या हातात वरमाळा आहे. वधूचा चेहरा पाहून वधूला खूप राग आल्याचे स्पष्ट दिसते. व्हिडीओमध्ये पुढे नववधू देखील हातात वरमाळा घेऊन उभी असलेली दिसत आहे. रागाच्या भरात ती वराला अशा प्रकारे हार घालते की हाराचा काही भाग तुटतो. वधूची स्टाईल पाहून तिथे उपस्थित लोक घाबरून जातात.

(हे ही वाचा: Video: उंचीने ‘छोट्या’ या नवरदेव नवरीचा SWAG बघितला का?)

(हे ही वाचा: Viral Video: सिंहाने केला बिबट्यावर जबरदस्त हल्ला, एकाच फटक्यात केली ‘अशी’ वाईट अवस्था!)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ priyajatav360 नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओला आतापर्यंत १२ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. व्हिडीओवर लोक अनेक मजेशीर कमेंट्सही करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘असे दिसते की वराला वधू आवडली नाही.’ दुसर्‍याने लिहिले की, ‘वराचे पुढे काय होईल?’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bride angrily threw the garland around groom neck and watch this viral video ttg