देशात आणि राज्यात करोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोविड१९चा धोका असूनही, लग्नाचा हंगाम जोरात सुरू आहे आणि भारतभर लग्न समारंभ आयोजित केले जात आहेत. अशाच एका लग्न समारंभात एक दुःखद, पण तितकीच विचित्र गोष्ट घडली आहे. एक तरुण नवरी तिच्या लग्न समारंभात गंभीर आजारी पडली आणि विधी सुरु असतानाच स्टेजवर कोसळली. या गोष्टीला नाट्यमय वळणात, दोन्ही कुटुंबांनी नंतर वर आणि मृत वधूची बहीण यांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. इटावा जिल्ह्यातील भरठाणा येथील समसपूर येथे ही घटना घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नातील विधी आटपल्यानंतर जोडपे सप्तपदीची विधी पार पडत असताना हा सर्व प्रकार घडला. वधू सुरभी अचानक मंजेश कुमार या वराच्या बाजूला बेशुद्ध पडली. यानंतर लगेचच एका डॉक्टरला बोलावण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरने तिला मृत घोषित केले आणि सांगितले की तिला हृदयविकाराचा झटका आला.

अबब! कडक उन्हात पठ्ठ्याने स्कुटीच्या सीटवर बनवले डोसे; Viral Video पाहून नेटकरी हैराण

अशा परिस्थितीत काय करावे हे कोणालाही कळत नव्हते. दोन्ही कुटुंबे एकत्र बसली आणि कोणीतरी सुचवले की वधूची धाकटी बहीण निशाचे लग्न वराशी करावे. दोन्ही कुटुंबीयांनी या विषयावर चर्चा केली आणि दोघांनी सहमती दर्शवली, अशी माहिती सुरभीचा भाऊ सौरभ याने दिली. ”सुरभीचा मृतदेह दुसऱ्या खोलीत ठेवण्यात आला आणि मंजेशचे लग्न निशासोबत पार पाडण्यात आले. लग्नानंतर जेव्हा वरात निघाली, तेव्हा सुरभीचे अंतिम संस्कार करण्यात आले, असे त्याने पुढे सांगितले.

‘गाढवावरुन ऑफिसला यायची परवानगी द्या’; पाकिस्तानमधील कर्मचाऱ्याचं पत्र व्हायरल, कारण वाचून आश्चर्य वाटेल

सुरभीचे काका अजब सिंग म्हणाले, “आमच्या कुटुंबासाठी हा एक कठीण निर्णय होता. एका खोलीत एक मुलगी मृतावस्थेत पडली होती आणि दुसऱ्या खोलीत दुसऱ्या मुलीचे लग्न होत होते. अशा संमिश्र भावना आम्ही कधीच अनुभवल्या नाहीत.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bride dies on stage during the saptapadi after this the groom tied the knot with her sister pvp