लग्नाच्या दिवशी वधूला मेकअपसाठी अनेक तास आधीच ब्युटी पार्लर गाठावे लागते, जेणेकरून तिला वेळेलावर तयार होता येईल. मात्र, नववधू ब्युटी पार्लरमध्ये पोहोचल्यावर त्यांना अनेक तास वाट पाहावी लागते, असे सर्वसाधारणपणे दिसून येते. सोशल मीडियावर ब्युटी पार्लरचे असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये नववधूचे सौंदर्य पाहून आपण आश्चर्यचकित होतो. पण सध्या सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक नववधू मेकअप करतानाच झोपून गेली आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक वधू मेकअप करत आहे. ती ब्युटी पार्लरमध्ये उपस्थित आहे. असे दिसते की वधू अनेक दिवस नीट झोपली नव्हती. म्हणूनच तिला ब्युटी पार्लरमध्ये विश्रांती मिळताच ती शांतपणे झोपी गेली. मेकअप करणार्‍या महिलेने तिच्या कॅमेऱ्यात याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि मेकअप करताना नवरी कशी झोपली हे दाखवले. झोपलेल्या वधूचे तोंड उघडे राहते. तिला आता कशाचीच पर्वा नाही असे दिसते.

हायवेवरच्या फलकाला लटकून केली Exercise; Viral Video पाहून नेटकरी झाले हैराण

या चिमुकलीचा व्हिडीओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ; Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, “ही तर बॉर्न डान्सर”

व्हिडीओ पाहून, वधू ब्युटी पार्लरला गेली असेल तेव्हा ती खूप थकली असावी असा अंदाज नेटकरी लावत आहेत. लग्नाच्या तयारीतून मुक्त होताच वधू शांतपणे झोपी गेली. सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत. teeshamakeovers नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मेकअप करताना नववधू अशा प्रकारे आराम करतात आणि जेव्हा मी त्यांचा मेकअप करते तेव्हा झोपी जातात’. इतर अनेक युजर्सनीही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader