सोशल मीडियावर लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना आपण बघतो. वधू-वरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी त्यांच्या अप्रतिम डान्सचे तर कधी कोणती मजेशीर गोष्ट करतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. पण बऱ्याचवेळा असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे पाहून आपल्याला हसू अनावरत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत वधू-वर मंडपात असल्याचे दिसत आहे. यावेळी वधूचा पहिला प्रियकर तिथे पोहोचतो. त्याला पाहून सर्वांना धक्काच बसतो. सुरुवातील पहिल्या प्रियकराला पाहून कोणालाही त्याच्यासाठी वाईट वाटेल. पण शेवटी वधूने दिलेल्या उत्तराने प्रेक्षकांना हसू अनावर झाले आहे.

आणखी वाचा : डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

हा प्रियकर फिल्मी स्टाइलमध्ये वधूला विचारतो तुझं माझ्यावर प्रेम आहे? यानंतर वधू बोलते, मी तुला ओळखतही नाही. प्रेम तर लांबची गोष्ट…निघून जा इथून… हे उत्तर ऐकून वधूच्या पहिल्या प्रियकराविषयी अनेकांना वाईट वाटतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bride groom was about to put on varmala and suddenly the brides lovers came watch the viral video dcp