लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे या क्षणांना आणखी खास बनण्याचा प्रयत्न सर्वजण करतात. कोणी लग्नात डान्स करताना दिसते, कोणी स्वत;ची एंट्री करण्यासाठी काहीतरी हटके कल्पना शोधून काढतात, कोणी एकमेकांसाठी सरप्राईज प्लॅन करतात. सध्या अशाच एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जिने असे खास भेट दिली जी यापूर्वी कधीही कोणी कोणाला दिली नसेल. हे सरप्राईज पाहून नवरदेवही खूप खुश झाला आहे. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुणीने लग्नाच्या साडीवर कोरल्या आठवणी!

प्रत्येक मुलगी नवरी होण्याचे स्वप्न पाहते. लग्नाच्या वेळी नवरी म्हणून स्वत:चा लूक कसा असावा याचा विचार करते. लग्नात सर्वात खास आणि सुंदर दिसावे प्रत्येक नवरीची इच्छा असते. लग्नातील लूक खास कसा करता येईल याचा विचार करते. अशाच एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या नवरीने चक्क आपल्या लग्नाच्या शालूवर तिची लव्हस्टोरी कोरली आहे. जेव्हा बॉयफ्रेंडने तिला पहिल्यांदा प्रपोज केले, जेव्हा दोघांनी पहिली कार घेतली, जेव्हा पर्वतरागांमध्ये दोघेही फिरायला गेले असे काही खास क्षण लग्नाच्या शालूवर कोरले आहेत. जे अत्यंत सुंदर दिसत आहे.

भन्नाट कल्पना पाहून नवरदेवही झाला थक्क

नवरीची साडी पाहून नवरदेवाला थक्क झाला आहे. असेही काही करता येऊ शकते यावर त्याचा विश्वास बसत नाहीये असे त्याच्या प्रतिक्रियेवरून दिसते आहे. त्यालाही नवरीची ही भन्नाट कल्पना प्रचंड आवडली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नेटकऱ्यांनी तरुणीची साडी प्रचंड आवडली आहे. इतकी सुंदर कल्पना पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत. अनेकांनी ही साडी कुठे बनवली असे प्रश्न विचार आहे तर काही जण साडी पाहून खूप कौतूक वाटत आहे.

हेही वाचा – प्रामाणिक कुत्रा! हिमाचल प्रदेशात २ ट्रेकर्सचा मृत्यू; कुत्र्याने ४८ तास केले मृतदेहाचे रक्षण

नवरीने लग्नाच्या शालूवर रेखाटली प्रेमाची गोष्ट!

हेही वाचा – धावत्या ट्रेनमधून तरुणीने मारली उडी! थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ शुट करणाऱ्यावर भडकले नेटकरी

इस्टाग्रामवर clickography’s नावाच्या अकांऊटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर कमेंट करत एकाने विचारले, ‘या साडीची किंमत किती असेल?” दुसऱ्याने लिहिले, व्वा, लग्नाच्या साडीत सर्व आठवणी ठेवण्याची कल्पना आवडली… सुंदर! तिसऱ्याने लिहिले की, “खूप विचारशील!!” चौथ्याने लिहिले की, “इतका सुंदर व्हिडिओ. या कल्पने मागील विचार आणि नियोजन आणि अंमलबजावणीसाठी सलाम”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bride painted a love story on the wedding shawl watches navardev reaction once video viral snk