Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून, सोशल मीडियावर लग्नातील अनेक मजेशीर किस्से, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यात लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; ज्यात वधू तिच्या वराला फटके मारताना दिसत आहे.
लग्नातील प्रत्येक प्रथा वधू-वरासाठी खूप खास आणि वधू-वराच्या आठवणीत राहणारी असते. यातील काही प्रथांमध्ये वर आणि वधूमध्ये भांडणं देखील पाहायला मिळते. लग्नात नवऱ्याचा बूट चोरताना किंवा हार घालतेवेळी नेहमीच वधू-वराची भावंडं आणि मित्र-मैत्रिणींकडून गोंधळ केला जातो. या प्रकारचे मजेशीर चेष्टेचे वातावरण हल्ली अनेक लग्नांत पाहायला मिळते, अनेकदा या गोंधळामुळे लग्न लावणारे गुरुजीदेखील वैतागतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नमंडपात वर आणि वधू गळ्यात वरमाला घालून एकमेकांसमोर उभे आहेत. यावेळी वधू वराला रसगुल्ला भरवत आहे पण वर मात्र गमतीमध्ये मागे मागे सरकत आहे. वर करत असलेलं नाटक पाहून वधूला त्याचा प्रचंड राग येतो ती त्याला घास भरवते आणि त्याला पकडून जोर जोरात मारते. यावेळी आजूबाजूला असलेले इतर लोक मोठमोठ्याने हसू लागतात.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @crazy_writer_01 या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास १३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “मागचे लोक मजा घेत आहेत.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “कसे कसे लोक आहेत पृथ्वीवर”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “पुढे काय झालं?” तर आणखी एकाने लिहिलंय की, “ढोल वाजत राहिला पाहिजे”
दरम्यान, याआधी देखील लग्नातील असेच काही मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यात कधी वरमाला घालताना तर कधी मिठाई भरवताना वर-वधूमध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळाला होता.