Bride’s Priceless Reaction to Meeting Her Groom :लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्या लग्नाचे स्वप्न पाहतात. आपला भावी जोडीदार कसा असेल याची कल्पना करतात आणि जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरते तेव्हा त्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही. अरेंज असो की लव्ह, लग्न करताना प्रत्येक मुलगा किंवा मुलीची एवढीच इच्छा असते की त्यांना मनासारखा जोडीदार मिळाला पाहिजे. जेव्हा मनासारखा जोडीदार मिळतो तेव्हा लग्नातील प्रत्येक क्षण नवरा- नवरी दोघांसाठी आनंदी आणि आणखीच खास होतो. अशाच एका नवरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे जिला मनासारखा जोडीदार मिळल्याचा आनंद झाला आहे.
व्हायरल व्हिडिओ एका लग्न कार्यालयातील आहे जिथे पांरपांरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्नसोहळा केला जात आहे.दरम्यान, लग्नकार्यालया नवरदेवा येतो तेव्हा नवरीचे कुटंबीय त्याचे स्वागत करत आहेत. हे सर्व नवरी हॉलमधील एक खोलीतून पाहात आहे. नवरदेवाला पाहून नवरी लाजत नाही तर आनंदाने नाचू लागते कारण तिला मनासारखा जोडीदाल मिळाला आहे आणि काही वेळात तिचा स्वप्न पूर्ण होणार आहे. नवरीच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
नेटकऱ्यांना आवडला व्हिडीओ
इंस्टाग्रामवर dikshamakeupartist नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अरेंज मॅरेजमध्ये जेव्हा मनासारखा जोडीदार भेटल्यावर नवरी…” व्हिडिओ इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. ६३ हजार पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला पसंती दर्शवली आहे तर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.