Bride In Metro Video Viral: रोज दिल्ली मेट्रोमधील नवनवीन व्हिडीओ समोर येत असतात. मेट्रोमध्ये नहेमी अशा घटना घडत असतात ज्याचे व्हिडीओ लोक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डीएमआरसीला उत्तर द्यावे लागत आहे. आता एक व्हिडीओ पुन्हा एकदा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारे दृश्य तुम्ही क्वचितच पाहिले असेल. काळजी करू नका या व्हिडीओमध्ये कोणतीही भांडण नाही कि कोणी विचित्र डान्स करत नाही.

खरंतर या व्हिडीओमध्ये एक मुलगी नववधूसारखी नटलेली दिसत आहे आणि तिने ब्रायडल लेहेंगा परिधान केला आहे. तिने नववधूसारखा मेकअप केला आहे, दागिने परिधाना केले आहे. ही तरुणी नवरीच्या गेटअपमध्ये प्रवास करताना दिसत आहे. सामान्यत: लग्नादिवशी नवरी कारने प्रवास करतात कारण हा लेहेंगा खूप जड असतो. लेहेंगा परिधान करून हालचाल करणे अवघड असते पण या तरुणीला मेट्रोने प्रवास करणे आवडत असावे म्हणूनच ती आनंदाने मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर कसालाही ताण किंवा चिंता दिसत नाही. ही तरुणी नववधूच्या लेहेंग्यामध्ये आपला मेट्रो प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहे.

pistol smuggler arrested with four others in Pimpri Chinchwad
पिंपरी- चिंचवड: पिस्तुलं विक्री करणारा डीलर पोलिसांच्या जाळ्यात; ७ पिस्तूल १४ जिवंत काडतुसे जप्त
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
as Passenger requested to IndiGo pilot to speak in Hindi
प्रवाशाच्या विनंतीवरून पायलटने केली चक्क हिंदीमध्ये अनाउंसमेंट; नेटकरी म्हणाले, “खूप चांगला प्रयत्न केला” VIDEO VIRAL
Viral video beating of two people in a moving bus video of incident happening in bhopal shocking video
लालबागनंतर भोपाळमधून संतापजनक प्रकार; चालू बसमध्ये ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी मारलं; थरारक VIDEO समोर
Who is Sultan Hassanal Bolkiah
Sultan Of Brunei: पंतप्रधान मोदी ब्रुनेई देशाच्या दौऱ्यावर; ब्रुनेईच्या सुलतानाकडे आहेत ७००० गाड्या, १७०० बेडरुम्सचा महाल
broken footboard on the Udupi to Karkala KSRTC bus how to board the bus Watch Viral Video
‘बाई…हा काय प्रकार!’ बसच्या तुटक्या पायऱ्या पाहून काळजात भरेल धडकी, बसमध्ये चढायचे कसे? पाहा Viral Video
A bull Picked up a four-wheeler vehicle with full of people
बापरे! बैलाने चक्क माणसांनी भरलेली चारचाकी गाडी उचलली; Video पाहून येईल अंगावर काटा

हेही वाचा – बाप रे! थेट मगरीच्या जबड्यातच टाकला व्यक्तीने हात अन् पुढच्या क्षणी…पाहा थरारक व्हिडीओ

हेवी ब्रायडल लेहेंगा घालून तरुणीने केला मेट्रोने प्रवास

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वधूने मरून रंगाचा हेवी ब्रायडल लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. ती सामान्य माणसाप्रमाणे उभी राहून प्रवास करत आहे. मेट्रोमध्ये वधूच्या पेहरावात मुलीला पाहून आजूबाजूला उपस्थित असलेले इतर प्रवासी हैराण झाले. सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. पण ती बेफिकीरपणे इकडे तिकडे फिरत असते.

हेही वाचा – दुधसागर धबधब्याकडे जाणाऱ्या ट्रेकर्सला का काढव्या लागत आहे उठाबशा? पाहा व्हिडीओ

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया काय होती?

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरील यूजर्सही हैराण झाले आहेत. एका यूजरने म्हटले, ‘अरे मॅडम, मेट्रोमध्ये कुठे गेली निघालीस?’ तर दुसरा युजर म्हणाला, ‘राजकुमारी लग रही हो’. सर्व युजर्सनी या व्हिडिओवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून वधूचे कौतुक केले आहे.