रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या दृढ नात्याचा सोहळा असतो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते, त्याला राखी बांधते, भाऊ आपल्या बहि‍णीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि लाडक्या बहि‍णीला ओवाळणी म्हणून पैसे किंवा खास वस्तू भेट देतो. ही प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. सख्या बहि‍णीशिवाय इतर बहि‍णी देखील मुलांना राखी बांधतात. मग प्रत्येक बहि‍णीला राखी ओवाळणी दिली पाहिजे ना. अशा परिस्थितीत प्रत्येक ओवाळणी देण्यासाठी मुलांना काहीतरी नियोजन हे करावे लागते. अशा एका भावाने बहि‍णींना ओवाळणी देण्याचे नियोजनाचा फोटो सध्या चर्चेत आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, ashu_chaudhari__01 नावाच्या पेजवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राखीचा खर्च एका भावाने मांडला आहे. या भावाच्या एकूण ७ बहि‍णी आहे. प्रत्येक बहि‍णीला किती ओवाळणी द्यायचे याचे व्यवस्थित नियोजन त्याने केले आहे, चला तर मग जाणून घेऊ या

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
a brother Holding a cockroach in his hand showed fear to his sister
झुरळ हातात पकडून बहि‍णीला दाखवली भीती; तुमच्या भावाने तुमच्याबरोबर कधी असं केलं का? पाहा Viral Video
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”

हेही वाचा – “आई गं…किती गोंडस!”, प्लास्टिकची बाटली वापरून आजी-आजोबांनी तयार केला कारंजा, Trending Video एकदा बघाच

प्रथम आत्याची मुलगी म्हणजे आते बहि‍णीला हा भाऊ ११ रूपये रोख ओवळणी म्हणून देणार आहे. त्यानंतर शेजारच्या काकूंच्या मुलीला १० रूपयांची एक डेअरीमिल्क देणार आहे. भावाने शाळेतल्या बहि‍णीसाठी सर्वात मोठी ओवाळणी देणार आहे जी तब्बल २१ रुपये रोख इतकी आहे. त्यानंतर ट्युशनमधील बहि‍णी देखील खास आहे जिला ११ रूपयांची ओवाळणी आणि ५ रूपयांची डेअरमिल्क देणार आहे. एवढंच नाही तर अचानक कोणी मुली राखी बांधायला आल्या तर त्यांनाही ओवाळणी देण्याची तयारी पठ्ठ्याने केली आहे, ज्यासाठी ५ रुपयाच्या चार पर्क घेण्याचे ठरवले आहे. पण स्वत:च्या बहि‍णीला मात्र त्याने नावाला ओवाळणी म्हणून फक्त १ रुपयाचे दोन इक्लेअर देणार आहे. त्याचा रक्षाबंधनाचा एकूण खर्च ८० रूपये होईल असे दिसते. फोटाच्या खाली “काय खतरनाक आहे राव भाऊ” असे लिहिले आहे.

हेही वाचा – फक्त शिकण्याची जिद्द हवी! भावडांना सायकलवर शाळेत घेऊन जाणाऱ्या चिमुकल्याचा Video चर्चेत

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “या रक्षाबंधनाचा सर्व प्लॅन झाला आहे.”

व्हिडीओवर एकाने कमेंट केली की, “मामाची मुलगी राहिली”